Video : समोसा आवडतो? मग खाण्यापूर्वी हॉटेलमधील हा व्हायरल व्हिडीओ बघा

मुंबई तक

12 Apr 2023 (अपडेटेड: 12 Apr 2023, 07:12 AM)

Satna video of washing potatoes with feet : समोसे शौकिनांनसाठी हा व्हिडिओ खुप महत्वाचा आहे. या व्हिडिओत किळसवाण्या पद्धतीने समोसे बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तसेच नागरीकांनी या हॉटेल (Hotel) मालकावर कारवाईची मागणी केली आहे.

a man washing patotes with his feet, satna video goes viral

a man washing patotes with his feet, satna video goes viral

follow google news

Satna video of washing potatoes with feet : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (video viral) होत असतात. काही व्हिडिओ खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. समोसे शौकिनांनसाठी हा व्हिडिओ खुप महत्वाचा आहे. या व्हिडिओत किळसवाण्या पद्धतीने समोसे बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तसेच नागरीकांनी या हॉटेल (Hotel) मालकावर कारवाईची मागणी केली आहे. (satna video of washing potatoes with feet food and safety officer reach restaurant)

हे वाचलं का?

व्हिडिओत काय?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक हॉ़टेल दिसत आहे. या हॉटेलमध्ये एक तरूण पायाने बटाटे (Washing Potatoes with feet) धूताना दिसत आहे. त्याच्या अशाप्रकारे धुण्याने अनेकांना किळस येतेय. तसेच अशाप्रकारे जर तो बटाटे धूवत असेल तर तो समोसा, वडापाव आणि इतर खाद्यपदार्थ कसे बनवत असे सवाल उपस्थित होत आहे.एका नागरीकाने हा व्हिडिओ (video viral) हॉ़टेल बाहेरून शुट केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ इंटरनेवर टाकला होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : नवी गर्लफ्रेंड सोबत असतानाच समोर आली जुनी प्रेयसी, मग काय..

व्हायरल झालेल्या हॉटेलमध्ये चायनीज पदार्थांसह, समोसा, डोसा आणि इडली सारखे खाद्यपदार्थ मिळतात. यामधील अनेक खाद्यपदार्थात बटाट्याचा वापर होतो. त्यामुळे नागरीकांना त्यांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे या प्रकरणात नागरीकांनी सोशल मीडियावर कारवाईची मागणी केली आहे. या मागणीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अभिषेक गौड आणि शीतल सिंह दीपांशी हॉटेलात पोहोचले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी हॉटेल मालकाला व्हिडिओ दाखवून कारवाई करण्याची माहिती दिली.

हॉटेल मालकाचे स्पष्टीकरण

हा व्हिडिओ 4 महिन्यापुर्वीचा आहे. ज्या कर्मचाऱ्याने असे कृत्य केले होते, त्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती हॉटेल मालकाने दिली आहे. तो कर्मचारी चांगले काम करत नव्हता. त्यामुळे त्याला मालकाने ओरडा दिला होता. या ओरड्यानंतर बदला घेण्यासाठी त्याने पायाने बटाटे धुतले होते. हा व्हिडिओ मालकाने देखील पाहायला होता. त्यानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते.

हे ही वाचा : बॉयफ्रेंडला घरी बोलावून सासू-सासऱ्यांची हत्या,पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा

हॉटेल मालकाच्या स्पष्टीकरणानंतरही अन्न व औषध प्रशासनाच्या (Food and Drug Administration) अधिकाऱ्यांनी खाद्य पदार्थाचे आणि खाद्य पदार्थासाठी वापरल्या जाणाऱ्या सामानांचे सॅम्पल घेतले आहेत. हे सॅम्पल तपासातून त्यांच्यावर कारवाई होणार आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर समोसे खायचे की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

    follow whatsapp