हिंगोलीत आजपासून सात दिवसांची कडक संचारबंदी

मुंबई तक

• 04:31 AM • 29 Mar 2021

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी आजपासून सात दिवस कडक संचारबंदी जाहीर केली आहे. ही संचारबंदी २९ मार्चच्या सकाळी ७ वाजल्यापासून ४ एप्रिलच्या दुपारी १२ पर्यंत असणार आहे. महाराष्ट्रातील वाहनांना गुजरातमध्ये ‘नो एंट्री’, कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील सर्व व्यक्ती, वाहने यांच्या दळणवळणास प्रतिबंध करण्यात आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या […]

Mumbaitak
follow google news

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी आजपासून सात दिवस कडक संचारबंदी जाहीर केली आहे. ही संचारबंदी २९ मार्चच्या सकाळी ७ वाजल्यापासून ४ एप्रिलच्या दुपारी १२ पर्यंत असणार आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील वाहनांना गुजरातमध्ये ‘नो एंट्री’, कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक

संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील सर्व व्यक्ती, वाहने यांच्या दळणवळणास प्रतिबंध करण्यात आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जाणार आहेत. शासकीय कार्यालये मात्र अंतर्गत कामकाजासाठी सुरू असणार आहेत. मेडिकल रुग्णालये कोरोना तपासणी केंद्र सुरूच असणार आहेत. दूध, कुरिअर, भोजनालये , त्यांना घरपोच सेवा देण्याची सूट देण्यात आली आहे. पण या संचारबंदी च्या काळात लग्न मात्र कोर्ट मॅरेज करावे असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढलेत, त्याचबरोबर नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे.

Corona रूग्ण वाढल्याने नांदेडमध्ये २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी

नांदेडमध्येही संचारबंदी

नांदेडमध्ये कोरोना रूग्ण वाढू लागल्याने २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची स्थिती चिंताजनक होऊ लागल्याने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. यामध्ये आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. ज्यानंतर नांदेडमध्ये २४ तारखेपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

‘१ एप्रिलपासून ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार’

औरंगाबादमध्ये ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, औरंगाबाद अशा अनेक महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडते आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद मध्ये स्थानिक प्रशासनाने ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

    follow whatsapp