आमदाराच्या मुलासह ‘त्या’ सात विद्यार्थ्यांचा अपघात रेस लावल्याने?; व्हायरल व्हीडिओमुळे चर्चा

मुंबई तक

• 06:33 AM • 31 Jan 2022

सुरेंद्र रामटेके, प्रतिनिधी, वर्धा वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा येथे 25 जानेवारीला झालेल्या अपघातात  वैद्यकीय महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थी हे नेमके गेले कुठे होते? याबाबत नानाविविध तर्कवितर्क लावले जात होते. मृत सात विद्यार्थ्यापैकी एक असलेल्या पवन शक्ती या विद्यार्थ्याचा सोमवारी दिवशी वाढदिवस होता आणि वाढदिवस साजरा करण्याकरिता सर्व विद्यार्थी बाहेर गेले होते. नागपूर-तुळजापूर महामार्गवरील […]

Mumbaitak
follow google news

सुरेंद्र रामटेके, प्रतिनिधी, वर्धा

हे वाचलं का?

वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा येथे 25 जानेवारीला झालेल्या अपघातात  वैद्यकीय महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थी हे नेमके गेले कुठे होते? याबाबत नानाविविध तर्कवितर्क लावले जात होते. मृत सात विद्यार्थ्यापैकी एक असलेल्या पवन शक्ती या विद्यार्थ्याचा सोमवारी दिवशी वाढदिवस होता आणि वाढदिवस साजरा करण्याकरिता सर्व विद्यार्थी बाहेर गेले होते. नागपूर-तुळजापूर महामार्गवरील देवळी समोरील इसापूर जवळील एका हॉटेलमध्ये हे गेले या अपघातापूर्वीचा आणखी एक व्हीडिओ समोर आला आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या शुभम जयस्वाल याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट हा व्हीडिओ मिळाला आहे. या व्हीडिओतून आपल्याला असं दिसून येतं की गाडीमध्ये गाणी लावून विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहेत. व्हीडिओत दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर सोबत त्यांनी रेसिंग लावल्याची चर्चा सुरु आहे. तर, एक विद्यार्थी आरामसे म्हणत असल्यानं गाडीचा वेग किती असेल, याबद्दल देखील वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

इसापूरच्या हॉटेलमधून परत येत असतानाचा व्हीडिओ

सेलसुरा अपघात प्रकरणातील आणखी एक व्हीडिओ समोर आला आहे. अपघाताच्या काहीवेळ पूर्वीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. देवळी तालुक्यात असलेल्या इसापूर हॉटेल मधून जेवण केल्यावर परत येताना गाडी चालवितानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. अपघात झाल्याच्या सातव्या दिवशी व्हिडीओ व्हायरल होत आहे. शुभम जैस्वालच्या इन्स्टाग्राम आयडीवर हा व्हीडिओ होता.

काय घडली होती घटना?

वर्ध्यात एका SUV कारचं नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात झाला. या अपघातात मेडिकलला शिकणाऱ्या सात जणांचा मृत्यू झाला. देवळी या ठिकाणाहून वर्धा या ठिकाणी येत असताना सेलसुरा या ठिकाणी हा अपघात झाला. चालकाचं वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. सुमारे 40 फूट पुलावरून ही कार कोसळल्याने हा भीषण अपघात झाला.

या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीडच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. तुळजापूर महामार्गावरच्या वर्धा देवळी मार्गावर ही घटना घडली. या अपघात भाजप आमदार विजय रहांगदळे यांचा मुलगा अविष्कारसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला. आता याच संदर्भातला व्हीडिओ समोर आला आहे. त्यावरून विविध चर्चा सुरू आहेत.

    follow whatsapp