शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा शिवसेनेचा म्हणजे आमचाच होणार अशी गर्जना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे. दसरा मेळावा कोण घेणार? याची चर्चा चांगलीच रंगली आहे. अशात उद्धव ठाकरेंनी ही घोषणा मुंबईतल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
ADVERTISEMENT
यंदाचा दसरा मेळावा कुणाचा? उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेंचा?
काय म्हणाले आहेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे?
महाराष्ट्राची माती गद्दारांना जन्म देत नाही, मर्दांना जन्म देते. अनेक विषय आहेत त्या विषयांवर मी दसरा मेळाव्यात मी बोलणारच आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार आणि तो शिवसेनेचा म्हणजे आमचाच होणार. दसरा मेळावा कुणाचा होणार याबाबत संभ्रम असण्याचं काही कारणच नाही. संभ्रम निर्माण करायचा आहे त्यांना तो करू द्या. मला त्याने काही फरक पडत नाही. शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार. त्यासाठी महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी तयारीही सुरू केली आहे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा हायजॅक करणार का? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर, म्हणाले…
महापालिकेच्या संमतीचा विषय आहे असं म्हटल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की जे काही तांत्रिक-मांत्रिक बाबी असतील त्या पाहून घेऊ. मात्र शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे आणि त्यासाठी तयारीही सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण दसरा मेळाव्यासाठी संमती मागणारे दोन अर्ज आल्याचं समजतं आहे. शिवसेनेत बंड झाल्यापासून शिवसेना दुभंगली आहे. त्यानंतर आता दसरा मेळावाही एकनाथ शिंदे हायजॅक करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अशात उद्धव ठाकरेंनी मात्र या सगळ्याला नकार दिला आणि शिवसेनेचा म्हणजे आमचाच दसरा मेळावा होणार असं ठामपणे सांगितलं आहे.
दीपक केसरकर यांनी याबाबत काय म्हटलं आहे?
दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर माहिती दिली. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या दृष्टीने काही गोष्टी पुढे आणले आहेत. दसरा हा हिंदूंचा महत्वाचा सण मानला जातो. यादिवशी सीमोल्लंघन केलं जातं. चांगल्या कामाची सुरुवात त्याविषयी केली जाते. दसरा मेळावा आणि बाळासाहेब ठाकरे हा अविभाज्य घटक आहे. ते वेगळं करता येत नाही. त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून आम्ही लांब गेलो नाही. त्याच्यामुळे दसरा मेळावा घ्यावा की घेऊ नये, याबाबत कुठलीही चर्चा एकनाथ शिंदे केली नाहीये, अशी महत्वाची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.
दसरा मेळावा ही बाळासाहेबांनी सुरु केलीली परंपरा आहे. ती परंपरा पुढे देखील कायम राहायला पाहिजे, अशी एकनाथ शिंदेंची भूमिका आहे. याच्यातून कुठलाही वाद निर्माण होता कामा नये. बाळासाहेबांच्या विचाराचं तंतोतंत पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे, असं केसरकर म्हणालेत.
ADVERTISEMENT