रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं असून रशिया सातत्याने हल्ले करत आहे. दुसरीकडे युक्रेननेही माघार न घेण्याची घोषणा केली आहे. आता या युद्धाचा परिणाम इतर देशांवरही झाला आहे. अगोदरच मोबाइल चिप टंचाईचा सामना करत असलेल्या उद्योगाची अवस्था आता आणखी बिकट होणार आहे.
ADVERTISEMENT
आता याच युद्धामुळे स्मार्टफोन आणखी महाग होऊ शकतात. Techcet या रिसर्च फर्मच्या मते, युक्रेन हा निऑन गॅसचा मोठा उत्पादक देश आहे. चिप बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या लेसरसाठी याचा वापर केला जातो. हे U.S. semiconductor-grade neon चा 90 टक्के पुरवठा करते.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सांगितले आहे की पॅलेडियमचा (Palladium) 35 टक्के स्त्रोत रशिया आहे. या दुर्मिळ धातूचा उपयोग अर्धसंवाहक बनवण्यासाठीही केला जातो. या दोघांमधील तणावामुळे या घटकांची निर्यात कमी होईल आणि याचा परिणाम इंटेलसारख्या (Intel) मोठ्या कंपन्यांवर होईल. जे 50% निऑन हे पूर्व युरोपमधून घेतात.
जेपी मॉर्गनच्या (JPMorgan) मते, कंपन्या चीन, अमेरिका आणि कॅनडामध्ये जाऊन पुरवठा वाढवू शकतात. परंतु, त्याचा वेग हा मंद असू शकते. मायक्रो चिपची कमतरता ही 2021 सालची मोठी समस्या आहे. 2022 मध्ये ही समस्या संपेल असा अंदाज काही विश्लेषकांनी वर्तवला होता.
पण, आता या युद्धामुळे हे शक्य होताना दिसत नाही. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. रशियाकडून मायक्रोचिपचा पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. परंतु, वर नमूद केल्याप्रमाणे, रशिया-युक्रेन हे मायक्रोचिप तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या उत्पादनांचे प्रमुख पुरवठादार आहेत.
Ukraine Russia War : स्फोटांनी हादरली राजधानी कीव, रशियाच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 137 जणांचा मृत्यू
चिप निर्माते ही समस्या एक किंवा दोन आठवडे रोखून ठेवू शकतात. परंतु, पुरवठा बराच काळ ठप्प राहिला, तर त्याचा मोठा परिणाम दिसून येईल. याचा परिणाम सेमीकंडक्टरच्या उत्पादनावर होईल. तसेच स्मार्टफोन, कार यासारखी मायक्रोचिप उत्पादनेही महाग होऊ शकतात.
ADVERTISEMENT