Sai Resort case, ED arrested SDO Jairam Deshpande: अनिल परबांना अडचणीत आणणाऱ्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. सदानंद कदम यांना अटक केल्यानंतर ईडीने आता एका बड्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे असं ईडीने अटक केलेल्या अधिकाऱ्याचं नाव असून, त्यांचं जानेवारीमध्ये निलंबन करण्यात आलं होतं. (Sub divisional officer Jayram Deshpande arrested by ED in Sai Resort case)
ADVERTISEMENT
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्ट प्रकरणाचा मुद्दा लावून धरला आहे. या प्रकरणात किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. याप्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू आहे. ईडीने या प्रकरणात सदानंद कदम यांना अटक केलेली असून, त्यानंतर देशपांडेंवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
Anil Parab यांचं दापोली रिसॉर्ट प्रकरण नेमकं काय आहे? काय आहे आरोप?
जयराम देशपांडे यांचं जानेवारीतच निलंबन
अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट व अन्य काही प्रकरणांत खोट्या व बेकायदेशीर पद्धतीने ना-विकास क्षेत्रात बांधकाम करण्याची परवानगी दिल्याच्या प्रकरणात राज्य शासनाने दापोलीचे उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांचं जानेवारीमध्ये निलंबन केलं होतं.
महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, 1981 च्या नियम 68 मधील तरतुदीनुसार जयराम देशपांडे यांना निलंबन निर्वाह भत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येतील असेही या आदेशात म्हटलेलं होतं. राज्य शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांच्या सहीने हा आदेश जारी करण्यात आला होता.
23 जानेवारी रोजी शासनाकडून हा आदेश जारी करण्यात आला होता. दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्ट हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांचे असल्याचा आरोप आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून वारंवार केला जात आहे.
Kirit Somaiya: “ठाकरे सरकार जमीनदोस्त झालंय, आता ऑक्टोबरमध्ये अनिल परब यांचे दोन रिसॉर्ट…”
साई रिसॉर्टचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बांधकाम करताना CRZ कायद्याचं उल्लंघन, फसवणूक, दस्तावेजात खाडाखोड, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष इत्यादी तक्रारी नमूद करत सोमय्यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. अनिल परब यांनी आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोगही केल्याचा आरोपही सोमय्यांनी त्या पत्रात केला होता. याच प्रकरणात ईडीने सदानंद कदम यांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT