मोदी भारताचे राजे नाहीत; भाजप खासदार स्वामींचं टीकास्त्र, सरकारला दिलं चर्चेचं आव्हान

मुंबई तक

• 11:38 AM • 14 Aug 2021

भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांवर बोट ठेवत घरचा आहेर दिला. मोदी सरकारच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांविरूद्ध असल्याचं घणाघात करत स्वामी यांनी जबाबदार व्यक्तींशी चर्चा करण्यास तयार असल्याचं जाहीर आव्हान दिलं आहे. स्वामी यांनी ट्विट करून परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देशाची […]

Mumbaitak
follow google news

भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांवर बोट ठेवत घरचा आहेर दिला. मोदी सरकारच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणांविरूद्ध असल्याचं घणाघात करत स्वामी यांनी जबाबदार व्यक्तींशी चर्चा करण्यास तयार असल्याचं जाहीर आव्हान दिलं आहे. स्वामी यांनी ट्विट करून परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देशाची माफी कधी मागणार आहेत, असंही स्वामी यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

आंतरराष्ट्रीय स्तरावर जो गोंधळ सुरू आहे, त्या गोंधळात भारतालाही ढकलणारी जयशंकर आणि अजित डोवाल ही नोकरशहा जोडी देशाची माफी कधी मागणार? त्यांना खुली सूट देण्यात आली कारण, मोदी समकक्ष राजकीय नेत्यांवर नाही, तर नेत्यांवर विश्वास ठेवतात. आता आपण आपल्या सर्वच शेजारी देशांशी गोंधळ केला आहे’, असं म्हणत सुब्रमण्यम स्वामी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

स्वामी यांच्या या ट्विटवर त्यांच्या एका चाहत्याने प्रतिक्रिया व्यक्त केली. ’स्वामीजी, मी आपला खुप मोठा चाहता आहे. जर पंतप्रधान मोदी आणि सरकार काही चुकीचं करत असेल, त्यावर टीका करण्याबद्दल मी आपलं समर्थनच करेन. पण आपलं प्रत्येक ट्विट त्यांच्या विरोधात असतं. आपण मोदी विरोधी आहात, असं वाटतंय; कारण त्यांनी तुम्हाला हवं असेललं मंत्रालय दिलं नाही’, असं या व्यक्तीनं म्हटलं आहे.

त्यावर स्वामी यांनी सरकारच्या धोरणांवर बोट ठेवत निशाणा साधला. ‘अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र नीतीविषयी मोदी सरकारची जी धोरण आहेत, मी त्याविरोधात आहे. याबद्दल मी कोणत्याही जबाबदार व्यक्तीशी जाहीर चर्चा करायला तयार आहे. तुम्ही सहभागी लोकशाहीबद्दल ऐकलं आहे का? मोदी भारताचे राजे नाहीत’, अशा शब्दात स्वामींनी मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.

स्वामी यांच्या या ट्विटवरही एकाने त्यांना थेट पंतप्रधानांना जाऊन भेटण्याची आणि चर्चा करण्याची सूचना केली. त्यालाही स्वामी यांनी उत्तर दिलं आहे. आपण २०१४ ते २०१७ या काळात मोदींना भेटण्याचा प्रयत्न केल्याचंही स्वामी ट्विटवर दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.

    follow whatsapp