तुमच्यासाठी कायपण… तरुणाने तीन बहिणींशी एकाच वेळी केलं लग्न!

मुंबई तक

• 12:35 PM • 03 Mar 2022

Man Married Three Women: एकाच वेळी तीन महिलांशी लग्न केल्याने एक पुरुष बराच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे त्या पुरुषाने तिन्ही महिलांशी एकत्र आणि एकाच दिवशी लग्न केलं आहे. सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे या तिन्ही महिला Triplets (एकत्र जन्मलेल्या बहिणी) आहेत. त्यांच्यासोबत लग्न केलेली व्यक्ती आफ्रिकन देश काँगोची रहिवासी असून Luwizo असे त्याचे नाव आहे. […]

Mumbaitak
follow google news

Man Married Three Women: एकाच वेळी तीन महिलांशी लग्न केल्याने एक पुरुष बराच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे त्या पुरुषाने तिन्ही महिलांशी एकत्र आणि एकाच दिवशी लग्न केलं आहे. सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे या तिन्ही महिला Triplets (एकत्र जन्मलेल्या बहिणी) आहेत. त्यांच्यासोबत लग्न केलेली व्यक्ती आफ्रिकन देश काँगोची रहिवासी असून Luwizo असे त्याचे नाव आहे. खरं म्हणजे Luwizo याला तिन्ही महिलांनी एकाच वेळी प्रपोज केलं होतं. त्यामुळे कोणालाही न दुखावता Luwizo ने तिघींशी लग्न करण्याचा अजब निर्णय घेतला.

हे वाचलं का?

Luwizo ने तिघींशी लग्न एकत्र करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपल्या तीन लग्नांबद्दल, Luwizo ने Afrimax English या यूट्यूब चॅनलशी बोलताना सांगितलं की, ‘असं वाटतं की मी एक स्वप्न पाहत आहे.’ दरम्यान, या लग्नामुळे त्याच्या तिन्ही बायकाही खूप खूश आहेत.

nypost.com च्या रिपोर्टनुसार, Luwizo याची पहिली ओळख नताली (Natalie) हिच्याशी झाली होती. नतालीने नंतर तिच्या बहिणी Nadege (नादेगे) आणि Natasha (नताशा) यांच्याशी ओळख करून दिली होती. या भेटीनंतर नतालीच्या बहिणी देखील Luwizoच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर या तीनही बहिणींनी Luwizo याला एकाच वेळी प्रपोज केलं.

Afrimax English शी बोलताना तीनही बहिणी असं म्हणाल्या की, ‘जेव्हा आम्ही Luwizo ला सांगितले की तो आम्हा तिघांना त्याच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तो देखील आम्हा तिघींच्या आधीच प्रेमात पडला होता. त्यामुळे देखील तो लग्नाला नकार देऊ शकला नाही. आम्हा तिघांनाही Luwizo हा फार आवडतो.’

Luwizo म्हणाला की, ‘आमच्या कुटुंबातील सदस्य या लग्नाबद्दल फारसे खूश नव्हते. माझ्या पालकांना असं वाटत होतं की, चुकीचं काम करत आहे. त्यामुळे या बहुपत्नीत्वावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होते. एवढंच नव्हे तर ते माझ्या लग्नालाही आले नाही.’

एक-दोन नव्हे तर तब्बल 27 बायकांसोबत राहणारा पती, 150 मुलं आणि बायकांवर लादतो विचित्र अटी

Luwizo पुढे असा म्हणाला की, ‘इतरांनी काहीही विचार केला तरी मी तिघींशी लग्न करून खूप आनंदी आहे. मी एवढेच म्हणू शकतो की प्रेमाला सीमा नसते.’ दरम्यान, या लग्नाबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे आणि अनेक जण याबाबत वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

    follow whatsapp