मंदिरातली दानपेटी चोरून नेणाऱ्या एका भुरट्या चोराला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. हिललाईन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गस्तीवर असताना ही कारवाई केली. परंतू यानंतर चोरट्याने चोरलेली चिल्लर मोजताना पोलिसांच्याच नाकीनऊ आले.
ADVERTISEMENT
लालजीतकुमार लोधी असं या चोराचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. उल्हासनगरच्या कैलास कॉलनी भागातून हा चोरटा शनिवारी एक भलंमोठं बोचकं घेऊन जात होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी चोराला हटकलं. पोलिसांनी थांबवल्यानंतर चोरटा आपलं बोचकं तिकडेच टाकून पळून जायला लागला.
पोलिसांनी चोरट्याचं बोचकं उघडून पाहिल्यावर त्यांना एक, दोन, पाच, दहा रुपयायंची तीन हजाराची नाणी सापडली. चोरट्याला पकडल्यानंतर त्याने आपण चालीया मंदिराच्या दानपेटीतली पैसे चोरल्याचं कबुल केलं. पोलिसांनी या मंदिराच्या व्यवस्थापकांना याची माहिती दिली असून चौकशीदरम्यान हा चोरटा याआधी याच मंदिरात सुरक्षारक्षकाचं काम करत असल्याचं समोर आलं आहे.
पंढरपूर : मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
ADVERTISEMENT