UPSC यूपीएससीने नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शुभम कुमार या परीक्षेत पहिला आला आहे. यूपीएससीच्या निकालानुसार, नागरी सेवा परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 545 पुरुष आणि 216 महिला आहेत. आयएएस अधिकारी आणि 2015 बॅचची टॉपर टीना डाबी यांची बहीण रिया डाबी यांनीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिया डाबीने 15 वी रँक मिळवली आहे.
ADVERTISEMENT
मुलींमध्ये कोण पहिलं आलं आहे?
भोपाळची जागृती अवस्थी देशात दुसरी तर मुलींमध्ये पहिली आली आहे. तर अंकिता जैननने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
महाराष्ट्राचे विद्यार्थी कोण कोण?
महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात 36 वी आली आहे तर विनायक नरवदे हा देशात 37 वा आला आहे. विनायक महामुनी 95 व्या क्रमांकावर आहे. पुण्यातील अंध विद्यार्थिनी पूजा कदम ही युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिने यात 577 वी रँक मिळवली आहे.
21 वर्षांची नितिशा जगताप पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण झाली आहे. तेही 199 व्या रँकने. गुरूवारी तिची दिल्लीत मुलाखत झाली आणि आज निकाल लागला. त्यामुळे ती आत्ता दिल्लीतच आहे.
महाराष्ट्रातील लातूरची असलेल्या नितिशाने पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतलं आहे. लातूर येथील निलेश गायकवाड यूपीएससीमध्ये देशात 629 रँकने उत्तीर्ण झाला आहे. गेल्या वर्षी ही निलेशने यूपीएससी परीक्षा दिली होती. त्यावेळी 752 रँक आली होती. तो सध्या संरक्षण सहाय्यक नियंत्रकपदी नियुक्तही झाला होता. सध्या त्याची पुण्यात त्याचं प्रशिक्षण सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील शुभम पांडुरंग जाधव याने 445 रँक मिळवणून यश मिळवलं आहे.
रँक 137- कमलकिशोर कांदरकर (लातूर)
रँक 138- दर्शन दुगड (यवतमाळ)
रँक 501- अभिजीत वेकोस (जालना-लातूर)
UPSC परीक्षेत 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 263 उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत. 86 उमेदवार मागासवर्गातील, 229 ओबीसी, 122 अनुसूचित जाती तर 61 अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. याशिवाय 150 उमेदवार रिझर्व्ह यादीमध्ये आहेत. त्यामध्ये 15 आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील, 55 ओबीसी, 5 अनुसूचित जाती तर 1 उमेदवार अनुसूचित जमातीमधील आहे.
ADVERTISEMENT