पुण्यात कबूतर चोरल्याच्या वादातून एका अल्पवयीन मुलाला बॅट आणि पट्ट्याने मारहाण करण्यात आली आहे. पुण्यातल्या येरवडा भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या प्रकरणी पीडित मुलाच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे व्हीडिओत?
या व्हीडिओत हे दिसून येतं आहे की एक मुलगा दुसऱ्या अल्पवयीन मुलाला बॅटने मारहाण करतो आहे. हा अल्पवयीन मुलगा रडतो आहे, विनवण्या करतो आहे. मात्र दुसरा मुलगा त्याचं काहीही ऐकून न घेता त्याला शिव्या देतो आहे. तसंच त्याला बेदम मारहाण करतो आहे. हा मुलगा त्याच्याकडे न मारण्यासाठी गयावया करतो आहे. मात्र बॅट हातात असलेला मुलगा त्याचं काहीही ऐकून न घेता त्याला माराहण करतो आहे.
कबूतर चोरल्याच्या आरोपावरून ही मारहाण या मुलाला करण्यात येते आहे. या घटनेत दिसणारी ही दोन मुलं कोण आहेत? हा मुलगा त्या मुलाला शिव्या का देतो आहे? इतकी मारहाण का करतो आहे? हे नीट कळू शकेलं नाही. मात्र कबूतर चोरल्याच्या आरोपावरून ही मारहाण केली जाते असं सांगितलं जातं आहे. सोशल मीडियावर हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
हा मुलगा नेमका कोण आहे? त्याचं नाव काय? या मुलाला मारहाण करणारा मुलगा कोण आहे? या दोघांच्या भोवती जमलेली मुलं कोण आहेत ते कळू शकलेलं नाही. मात्र पुण्यात सोशल मीडियावर हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT