Walmik Karad CCTV Video : वाल्मिक कराड आणि एकूणच सर्व आरोपींबद्दल रोज खळबळ उडवून देणारी माहिती समोर येताना दिसत आहे. 9 डिसेंबर 2024 ला ही घटना घडली होती. त्यानंतर या प्रकरणामुळे राज्यभरात वातावरण ढवळून निघालं. मात्र तरीही 31 डिसेंबरपर्यंत पोलिसांना एकही आरोपी शोधता आला नव्हता. 31 डिसेंबरला वाल्मिक कराड हा स्वत: पुण्यातील CID कार्यालयात अत्यंत नाट्यमयरित्या हजर झाला होता. शरण येण्यापूर्वी वाल्मिक कुठे होता याबद्दल वेगवेगळे कयास लावले गेले, मात्र तो कुठे होता हे आणखी स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Walmik Karad Admitted to Hospital : वाल्मिकची तब्बेत बिघडली, कडेकोट बंदोबस्तात मध्यरात्री कारागृहातून थेट रुग्णालयात हलवलं
वाल्मिक कराड थेट पुण्यात हजर झाल्यानं तो पुण्यातच असल्याच्या चर्चा सुरू होत्या. हजर होण्यापूर्वी त्यानं एक व्हिडीओ जाहीर केला होता. मात्र, वाल्मिक कराड ज्या स्कॉर्पिओ गाडीतून सीआयडी कार्यालयात आला होता, तशीच दिसणारी ही पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी 30 डिसेंबरला बीडमधून रवाना होतानाचे वेगवेगळे सीसीटीव्ही समोर आले आहेत. CID ला शरण येताना वापरलेल्या शिवलिंग मोराळे यांच्याच कारमधून वाल्मिक बीडमधूनच पुण्याला गेला होता का? असा सवाल उपस्थित होतोय.
त्यामुळे, CID ला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड बीडवरून पुण्याला गेला होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे . याबाबतची शंका निर्माण करणाऱ्या तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत . पुण्यात सीआयडीला शरण येण्यापूर्वी त्याच मांजरसुंबामधून पुण्यात आलिशान गाड्यांमधून वाल्मिक गेल्याची शक्यता या सीसीटीव्हीमुळे बळावली आहे.
हे ही वाचा >> Jalgaon Train Accident : "चहा वाल्यानं सांगितलं आग लागली, म्हणून लोकांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या"
"वाल्मिक अण्णा एका बारक्या गाडीतून येत होते. त्यांना मी दिसल्यावर त्यांनी आवाज दिला. म्हणाले या बारक्या गाडीत बसता येत नाहीये, मला सीआयडी ऑफिसला सोड. त्यांच्यासोबत लोक होते, पण मी त्यांना ओळखत नाही. मी त्यांना सीआयडी ऑफिसला सोडलं" असं या गाडीचे मालक शिवलिंग मोराळे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणात शिवलिंग मोराळे यांची चौकशी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
