संपूर्ण देश सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढतो आहे. दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशातील आरोग्य यंत्रणेवर दबाव येताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन सरकारी यंत्रणा वारंवार करत आहेत. कोरोनामधून सावरल्यानंतर अनेकदा आपल्या शरिरातली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जाते. त्यामुळे या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर कोणत्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करायला हवा याची यादीच केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
केंद्र सरकारने कोरोनामधून सावरलेल्या रुग्णांना तसेच अन्य नागरिकांनाही डार्क चॉकलेट, हळदीचं दुध, प्रथिनयुक्त पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करण्याबाबत सांगितलं आहे. जाणून घ्या काय आहेत हे पदार्थ ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहिल…
-
कोरोनाची बाधा झालेल्या आणि त्यामधून सावरलेल्या रुग्णांनी आपले स्नायू आणि उर्जेची पातळी कशी वाढवता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
-
नाचणी, ओट्स आणि अमरनाथ अशा धान्यांचा वापर आहारात करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
-
कोंबडीचं मांस, मासे, अंडी, सोया, सुका मेवा, चीज यासारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचाही आहारात समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
-
याव्यतिरीक्त जेवण बनवताना शक्यतो ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचं तेल वापरण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे.
-
याव्यतिरीक्त कोरोनामधून सावरलेल्या रुग्णांनी आपल्या शरिराची नियमीत हालचाल होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे. याचसोबत श्वसनाचा आजार होऊ नये यासाठी प्राणायाम करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
-
तसेच या काळात स्वतःला चिंतेतून मुक्त ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
-
याचसोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या दिवसांमध्ये हळदीचं दूध पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT