राज्यात अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू होणार आहेत अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती. मात्र मुंबईतील शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न होताच. मात्र आता मुंबईत शाळा सुरू होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
डॉक्टरांच्या टास्क फोर्सने म्हणजेच डॉक्टरांच्या विशेष कृतीदलाने दिलेल्या सूचनांचं पालन करून ४ ऑक्टोबरपासून मुंबईत शाळा सुरु होणार आहेत अशी माहिती इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांनुसार राज्यातल्या ग्रामीण भागात 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वी पर्यंतची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता मुंबईतल्या शाळाही सुरू होणार आहेत अशी माहिती इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. शाळा सुरु झाल्या तरीही शाळांमधले खेळ अर्थात Sports सुरू केले जाणार नसल्याचंही चहल यांनी सांगितलं आहे. तसंच टास्क फोर्सने दिलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करून शाळा सुरू केल्या जातील.
School Reopening : शाळा, पालक, विद्यार्थ्यांना ‘या’ गोष्टी कराव्या लागणार
विद्यार्थ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत देखील नियमावली तयार करण्यात आली असल्याच त्यांनी सांगितलं. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोन लस (Vaccine) घ्याव्या असंही SOP मध्ये असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, सुरक्षेची काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येईल आणि यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ही सूचना दिल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना घरात आल्यावर कपडे बदलणे, मास्क (Mask), याबाबत सूचना दिल्या जातील. विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी असेल तर पालकांना आणि शिक्षकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येतील मुलांचे टेम्प्रेचर नेहमी तपासले जावे तसेच ज्या शाळा कोव्हिड सेंटर म्हणून वापरल्या आहेत. त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशा सुचनांसह शाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या सहमतीनेच उपस्थित करा असही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. पालकांची सहमती महत्वाची आहे. दरम्यान अनेक महिन्यांनी शाळा उघडणार असल्याने पालक आणि मुलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
जाणून घेऊयात काय आहे सरकारची ही नवीन नियमावली? –
१) प्रत्येक शाळेत शक्य असल्यास हेल्थ क्लिनीक सुरु करावं.
२) विद्यार्थ्यांचं नियमीत टेम्प्रेचर चेक केलं जावं.
३) शक्य असल्यास यासाठी इच्छूक डॉक्टरांची मदत घ्यावी.
४) सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात.
५) हेल्थ क्लिनीकसाठी स्थानिक आरोग्य केंद्रातले डॉक्टर आणि परिचारिकांची मदत घ्यावी
६) या कामासाठी लागणारा निधी CSR फंडातून खर्च करावा.
याव्यतिरीक्त मुलांसाठी आणि पालकांसाठीही यात काही खास सूचना देण्यात आल्या आहेत –
१) मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावं.
२) ज्या शाळांमध्ये खासगी स्कूलबस, वाहनांनी विद्यार्थी येतात अशा वाहनांमध्ये एका सिटवर एक विद्यार्थी बसून प्रवास करेल याची काळजी घेतली जावी.
३) विद्यार्थी बसमध्ये चढताना आणि उतरताना वाहनचालक किंवा वाहकाने विद्यार्थ्यांना सॅनिटायजरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहीत करावं.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी यात खास सूचना देण्यात आल्या आहेत –
१) जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबणाने किंवा सॅनिटायजरे हात धुण्याची विद्यार्थ्यांना आठवण करुन द्यावी.
२) वह्यांची अदलाबदल होणार नाही यासाठी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सांगावं.
३) वेळ असल्यास शक्यतो गृहपाठ वर्गातच करुन घ्यावा.
४) सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत.
५) कोरोनाची परिस्थिती सर्वसामान्य झाली की खेळ सुरु करायला हरकत नाही तरीही असे खेळ खेळत असताना आवश्यक ती काळजी घ्यावी.
६) खेळाचं साहित्य सॅनिटाईज करावं.
७) खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेषकरुन दमलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं.
८) विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क आणि दोन मीटरचं अंतर असावं.
९) जवळचे संबंध येणारे खो-खो, कबड्डी असे खेळ टाळावेत.
ADVERTISEMENT