Amul Butter : ओरिजनल-बनावटमध्ये गोंधळ आहे? ही बातमी तुमच्यासाठी

मुंबई तक

• 07:26 AM • 16 Mar 2023

Amul Butter viral video : मस्का, बटर असं नाव काढलं तरी तुमच्या डोळ्यासमोर अमूल बटर येतं. पण जर तुम्हाला कोणी विचारले की ओरिजनल अमूल बटर आणि नकली अमूल बटरमध्ये काय फरक आहे? तर तो अनेकांना सांगता येणार नाही. अशातच ‘द प्रेस आय काश्मीर’ या फेसबुक पेजने अमूल बटरवर बनवलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. […]

Mumbaitak
follow google news

Amul Butter viral video :

हे वाचलं का?

मस्का, बटर असं नाव काढलं तरी तुमच्या डोळ्यासमोर अमूल बटर येतं. पण जर तुम्हाला कोणी विचारले की ओरिजनल अमूल बटर आणि नकली अमूल बटरमध्ये काय फरक आहे? तर तो अनेकांना सांगता येणार नाही. अशातच ‘द प्रेस आय काश्मीर’ या फेसबुक पेजने अमूल बटरवर बनवलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तसं तर, हा व्हिडिओ 4 नोव्हेंबर 2022 रोजी फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. मात्र आता हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. (Amul Butter: Confusion between which is original and which is fake?)

व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने अमूल बटरचे दोन डब्बे प्लेटमध्ये ठेवले आहेत. 2 अमूल बटरपैकी एक ओरिजनल आणि एक बनावट असल्याचा दावा त्या व्यक्तीने केला आहे. या दाव्याचा आधार असा की, नकली अमूल बटरच्या पॅकेटवर किंवा डब्ब्यावर ग्रीन डॉट बनवला आहे. तर अमूल बटरच्या ओरिजनल पॅकेटवर हा ठिपका नसतो. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने पुढे म्हटलं की, खऱ्या बटरवर भारत सरकारचा शिक्का आहे, तर नकली बटरवर भारत सरकारचा शिक्का नाही. संपूर्ण व्हिडीओमध्ये असे काही दावे केले आहेत.

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमूलकडून एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. अमूलने ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जारी केलेल्या निवेदनात म्हंटलं आहे की,

तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, अमूल बटरला चीनमध्ये बनवून नकली बटर असल्याचं सांगतं व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटे मेसेजे फॉरवर्ड केले जात आहेत. पण आम्‍ही तुम्‍हाला खात्रीपूर्वक सांगतो की या व्‍हिडिओमध्‍ये दाखवलेले अमूल बटरचे दोन्ही पॅकेट ओरिजनलच आहेत आणि ते अमूलने भारतातच बनवले आहेत.

गुणरत्न सदावर्ते मैदानात : कर्मचाऱ्यांच्या संपाला कडाडून विरोध; उचललं मोठं पाऊल

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार, सर्व नवीन दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकच्या पुढील बाजूस शाकाहारी लोगो प्रदर्शित करणे आवश्यक आहे. व्हिडिओ क्लिपिंगमध्ये जुन्या पॅक आणि अमूल बटरच्या नवीन पॅकमधील तुलना दर्शविली गेली आहे आणि चुकीची माहिती निर्माण करण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये भीती आणि चिंता निर्माण करण्यासाठी वापरली गेली आहे.

ही फेक न्यूज तयार करणाऱ्या श्रीनगरमधील लोकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. हा मेसेज तुमच्या कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करा आणि त्यांना जागरूक करा, असं आवाहनही अमूलकडून करण्यात आलं आहे.

Maharashtra political Crisis: “व्हिपचं उल्लंघन म्हणजे सदस्यत्व स्वत:हून सोडणे”

पण आता प्रश्न पडतो की नेमकं खरं कोण बोलतंय? अमूल की व्हायरल व्हिडिओ? तर याच उत्तर आहे अमूल. कसे? आम्ही सांगतो. अमूलने सांगितले की, व्हिडिओमध्ये अमूल बटरचे जुने पॅकिंग दाखवले जात आहे. याची पडताळणी करण्यासाठी आम्ही अमूलच्या वेबसाइटच्या आर्काइवमध्ये गेलो. 24 मे 2022 रोजी आर्काइव केलेल्या वेबसाईटच्या पेजवर अमूल बटरवर हिरवा ठिपका नसलेलं पॅकेट दिसून येत आहे.

या दोन्ही फोटोंमधील फरक बघितला तर नवीन बटर पॅकेटवर तुम्हाला स्पष्टपणे एक ग्रीन डॉट दिसून येत आहे. याचाच अर्थ व्हिडीओमध्ये केलेला दावा खोटा असून तुमच्या अमूल बटरच्या पॅकेटवर ग्रीन डॉट असेल तर घाबरण्याची आवश्यकता नाही. हे ओरिजनल अमूल बटर आहे आणि हे तुम्ही खाऊ शकता.

    follow whatsapp