भारतात Corona ची तिसरी लाट कधी येणार ? जाणून घ्या तज्ज्ञांनी काय दिलं आहे उत्तर

मुंबई तक

• 10:39 AM • 06 May 2021

सध्या आपला देश कोरोनच्या दुसऱ्या लाटेशी लढा देतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं स्वरूप इतकं भीषण आहे की त्यापुढे पहिली लाट ठीक होती असं म्हणायची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो आहे. तसंच जगात अनेक देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊन गेली आहे आणि चौथी लाट येण्याची चिन्हं दिसत आहेत. अशात भारतातही चर्चा सुरू झाली […]

Mumbaitak
follow google news

सध्या आपला देश कोरोनच्या दुसऱ्या लाटेशी लढा देतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं स्वरूप इतकं भीषण आहे की त्यापुढे पहिली लाट ठीक होती असं म्हणायची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो आहे. तसंच जगात अनेक देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊन गेली आहे आणि चौथी लाट येण्याची चिन्हं दिसत आहेत. अशात भारतातही चर्चा सुरू झाली आहे ती कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची. दुसऱ्या लाटेत कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केलेलं असताना तिसऱ्या लाटेचीही चर्चा भारतात होऊ लागली आहे. अनेक आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असं म्हटलं आहे. जाणून घेऊया ही तिसरी लाट कधी येऊ शकते आणि या तिसऱ्या लाटेत काय काय होऊ शकतं यावर तज्ज्ञांनी मांडलेली मतं.

हे वाचलं का?

1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण ही घोषणा मोदी सरकारने तयारीशिवायच केली?

नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य आणि सल्लागार डॉ. गिरीधर बाबू काय म्हणतात?

कोरोनाची तिसरी लाट भारतात हिवाळ्यात येऊ शकते म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे असू शकतात. जर दिवाळीच्या आधी देशातल्या बहुतांश लोकांचं लसीकरण झालं तर या तिसऱ्या लाटेत अनेकांचे जीव वाचतील. ही तिसरी लाट खासकरून तरूणांना त्रास देणारी ठरू शकते. या तिसऱ्या लाटेत अनेक बदलही घडू शकतात. आत्तापासून आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयारी ठेवली पाहिजे. त्यामुळे होणाऱ्या बदलांचा फारसा परिणाम आपल्यावर कसा होणार नाही याचा अभ्यास केला पाहिजे असंही डॉ. बाबू यांनी सुचवलं आहे.

तिसऱ्या लाटेमध्ये काय काय घडू शकतं याबाबत प्रोफेसर एम विद्यासागर म्हणतात..

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बहुसंख्य लोकांना कोरोना संसर्ग झाला. आज घडीलाही असेही काही रूग्ण आहेत ज्यांची चाचणी झालेली नाही. जे कोरोनातून बरे झाले आहेत त्यांच्यात अँटी बॉडीज तयार झाल्या आहेत. मात्र जे लक्षणं नसलेले रूग्ण आहेत त्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहे.

पुढच्या सहा महिन्यात त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली तर त्यांना कोरोना संसर्गाचा तिसऱ्या लाटेत धोका आहे. त्यासाठी सुयोग्य आणि वेगवान पद्धतीने लसीकरण कार्यक्रम सुरू ठेवणं हे देशासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रतिकार शक्ती कमी झाली तरीही तिसऱ्या लाटेत व्हायरसचा संसर्ग होण्यापासून वाचण्यासाठी त्यांना लस उपयोगी पडू शकते असं मत विद्यासागर यांनी वर्तवलं आहे.

Record! महाराष्ट्रात एका दिवसात 5 लाखांपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण

डॉ. बाबू यांनी आणखी काय म्हटलं आहे?

मोदी सरकारने कोरोनाच्या लाटांसाठी सज्ज राहणं अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाची चौथी लाटही येण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियोजनबद्ध आरोग्य योजना आखणं हे अत्यंत आवश्यक आहे. एवढंच नाही तर राज्यांनीही त्यांच्या राज्यातील तज्ज्ञांकडून योग्य त्या उपाय योजनांबाबत माहिती घ्यावी आणि त्या उपाय योजना कराव्यात. एवढंच नाही लसीकरणाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम सगळ्या राज्यांनीही हाती घेतला पाहिजे.

तिसरी लाट थोपवता आली तर उत्तम मात्र समजा ती आलीच तर त्यासाठी लढण्याची तयारी हवी. कोरोनाशी लढण्यासाठी सुक्ष्मातली सूक्ष्म योजना हवी. तसंच कोरोना झाला तर काय करायचं यासाठीचं योग्य ते उपाय आणि बेड्सची व्यवस्था केली पाहिजे. त्यासाठी योग्य ते प्लानिंग करणं आवश्यक आहे असंही डॉ. बाबू यांनी सुचवलं आहे. एवढंच नाही तर लसीकरण वाढवणं हे अत्यंत हिताचं ठरणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp