Urfi Javed: चित्रा वाघांची कोंडी करणारी उर्फी जावेद आहे तरी कोण?

मुंबई तक

• 08:10 AM • 02 Jan 2023

Urfi Javed Biography in Marathi: मुंबई: भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यातील वाद वाढला आहे. चित्रा वाघ यांनी थेट पोलिसात तक्रार करुन उर्फी जावेदला अटक करण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे उर्फी जावेद ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी आपल्या विचित्र स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. पण उर्फी […]

Mumbaitak
follow google news

Urfi Javed Biography in Marathi: मुंबई: भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यातील वाद वाढला आहे. चित्रा वाघ यांनी थेट पोलिसात तक्रार करुन उर्फी जावेदला अटक करण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे उर्फी जावेद ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी आपल्या विचित्र स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. पण उर्फी अश्लील पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी कपडे परिधान करत असल्याची टीका करत चित्रा वाघ यांनी थेट तिला अटक व्हावी यासाठी मुंबई पोलिसात (Mumbai Police) तक्रार दाखल केली आहे. याच उर्फीबाबत आता आपण जाणून घेऊया सविस्तरपणे. (who is urfi javed know everything about his family career and journey so far)

हे वाचलं का?

सुरुवातीला बिग बॉस ओटीटीमध्ये उर्फी जावेदची एन्ट्री झाली होती. तेव्हापासूनच ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली. बिग बॉस ओटीटीमध्ये एंट्री घेतलेल्या उर्फीने आपल्या खास शैलीने चाहत्यांना आकर्षित केलं होतं. तसंच या शोमुळे तिच्या प्रसिद्धीत आणखी भर पडली. मात्र, त्यानंतर उर्फीने आपल्या विचित्र स्टाइलमधील फोटो जेव्हा सोशल मीडियावर शेअर करणं सुरु केलं तेव्हा सोशल मीडियावर एकच गदारोळ झाला. मात्र, तरीही उर्फीने तसे फोटो टाकणं सुरुच ठेवलं.

उर्फी जावेदने आता मात्र कमालच केली; फोटो पाहून नेटकऱ्यांनी लावला डोक्याला हात

उर्फी जावेद मूळची कुठली? (Urfi Javed Story)

अभिनेत्री उर्फी जावेद ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे. 15 ऑक्टोबर 1997 रोजी जन्मलेली उर्फी आता 25 वर्षांची आहे. जिने यापूर्वी मास कम्युनिकेशनमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. सुरुवातीला तिला मीडियामध्ये जायचे होते पण तिला अभिनयाची अधिक आवड होती. त्यामुळेच अगदी लहान वयात उर्फी ही मुंबईत आली. 2016 मध्ये तिला ‘बडे भैया की दुल्हनिया’ या मालिकेत अवनी पंत नावाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

यानंतर, त्याच वर्षी तिला ‘चंद्र नंदिनी’ मालिका मिळाली ज्यामध्ये ती छायाच्या भूमिकेत दिसली. याशिवाय ‘मेरी दुर्गा’ या मालिकेतून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली त्यामुळे ती घराघरात पोहचली. याशिवाय उर्फी बेपनाह, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसौटी जिंदगी की सारख्या मालिकांमध्ये देखील झळकली. 2020 मध्ये ती इतकी लोकप्रिय झाली की 2021 मध्ये तिला बिग बॉस OTT मध्ये येण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं.

बिग बॉस OTT मधून मिळाली खरी ओळख

उर्फी जावेद जोपर्यंत मालिकांमध्ये दिसत होती तोपर्यंत तिची ओळख मर्यादित होती. कारण की, तरुणाई या मालिकांपासून दूर राहणं पसंत करते, परंतु जेव्हा उर्फी बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये दिसली तेव्हा ती तरुणांमध्ये लोकप्रिय झाली. विशेषतः तिच्या ड्रेसिंग सेन्सची आणि स्टाइलची प्रचंड चर्चा होऊ लागली. सोशल मीडियावर ती अनेकदा तिच्या अत्यंत विचित्र स्टाईलमुळे चर्चेत असते.

‘जेलमध्ये जाण्यास तयार, आधी…’, उर्फी जावेदचं चित्रा वाघांना आव्हान

कुटुंबाशी वाद, कसं आहे उर्फीचं खासगी आयुष्य? ( Urfi Javed Family)

उर्फी जावेदने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने तिच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींचा सामना केला आहे. एका गैरसमजामुळे तिचे तिच्या कुटुंबीयांशी संबंध चांगले राहिले नाहीत. 2 वर्षे मानसिक छळाचा सामना केल्यानंतर उर्फीने स्वतःला सावरलं आणि तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं.

पण आता हीच उर्फी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे आता तिच्यावर कारवाई होणार की, ती सहीसलामत सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp