Why I Killed Gandhi या सिनेमावर बंदी घाला अशी मागणी करणारं पत्र आता काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. हा सिनेमा 30 जानेवारीला म्हणजेच महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रिलिज होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलिज केला जाऊ नये म्हणून आता काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. उद्धव ठाकरे हे आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
या सिनेमात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे हे पात्र साकारलं आहे. हा सिनेमा 2017 मध्ये चित्रीत झाला होता. तो रिलिज होईल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र चा दिवसांपूर्वी याचा ट्रेलर आला आणि हा सिनेमा रिलिज होणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून वाद निर्माण झाला. ज्यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता त्यापाठोपाठ काँग्रेसनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
Why I Killed Gandhi या सिनेमावर बंदी घाला, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचं पंतप्रधान मोदींना पत्र
काय म्हटलं आहे काँग्रेसने पत्रात?
फॅसिस्ट विचारांचे नथुराम गोडसे यांनी 30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधी यांची हत्या केली. याच दिवसाचे औचित्य साधून कडव्या विचारांचे चित्रपट निर्माते 30 जानेवारी 2022 Why I Killed Gandhi? हा चित्रपट दिग्दर्शित करू पाहात आहेत. महात्मा गांधीजींच्या विचाराने संपूर्ण जग प्रभावित आहे. आपल्या भारत देशाची ओळखही गांधीजींच्या नावाने होते. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येतं.
छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे ‘नथुराम गोडसे’ का झाले?
महात्मा गांधी यांच्या लढ्याने हे दाखवून दिलं आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच ३० जानेवारी हा दिवस राष्ट्रीय एकता, जातीय सलोखा, अहिंसा आणि शांतता दिवस म्हणून संपूर्ण जगभरात पाळला जातो. एकीकडे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवस अहिंसा आणि शांतता म्हणून पाळला जातो आहे.
अशात Why I Killed हा चित्रपट द्वेष, हिंसक वृत्तीचं प्रदर्शन करणारा आहे. कोणत्याही घृणास्पद आणि अमानवीय कृत्याचं उदात्तीकरण भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यामुळे हा सिनेमा रिलिज होऊ देऊ नये अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करत आहोत.
ADVERTISEMENT