मुंबई: देशात सध्या कोरोनाचे (Corona) रुग्ण प्रचंड वाढत आहे. अशा संकटसमयी देशात ऑक्सिजनचा (Oxygen) देखील तुटवडा भासत आहे. याचवेळी रुग्णांचे नातेवाईक हे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि प्लाझ्मासाठी वणवण भटकत आहे. देशात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना दुसरीकडे ज्याची सर्वाधिक मागणी आहे ती गोष्ट आहे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर. (Oxygen concentrator)
ADVERTISEMENT
देशात जसजसे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत तसंतसं ऑक्सिजनची कमतरता असल्याचं दिसून आलं अशावेळी सर्वाधिक मागणी ही ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरला असल्याचं दिसून आलं आहे. तर आता आपण जाणून घेऊयात की, ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर नेमकं आहे तरी काय आणि ते नेमकं कोरोना रुग्णासाठी (Corona Paitent) काय काम करंत.
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर काय आहे? (What exactly is an oxygen concentrator?)
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे एखाद्या कॉम्प्युटरच्या मॉनिटर स्क्रिनपेक्षा थोडा मोठा आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आणि ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यानंतर ऑक्सिजन थेरपीसाठी सर्वात जास्त ज्या उपकराणांना मागणी आहे त्यापैकी ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे एक आहे. विशेषत: रुग्णाला घरात आयसोलेशन दरम्यान आणि रुग्णालयात ऑक्सिजनची कमरता असल्यास हे कन्सन्ट्रेटर सर्वात जास्त उपयोगी असल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबईत 12 रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची लवकरच उभारणी
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर काम कसं करतं? (How does Oxygen Concentrate work?)
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे एक पोर्टेबल मशीन आहे. ज्याच्या मदतीने रुग्णांसाठी हवेतून ऑक्सिजन तयार केला जातो. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर प्रेशर स्वेंग ऑबर्झव्हेशन टेक्नोलॉजीच्या वापर करतं. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे अशा जागी वापरलं जातं जिथे द्रव (Liqud) ऑक्सिजन किंवा प्रेश्चरायईज्ड ऑक्सिजनचा वापर हा धोकादायक ठरु शकतो.
घरात किंवा छोट्या क्लिनिकमध्ये याचा वापर करताना ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे हवेतून नायट्रोजन वेगळं करतं आणि ऑक्सिजनच्या अधिक असणाऱ्या वायूला बाहेर काढतं. ज्याचा वापर ऑक्सिजनची गरज असणारे रुग्ण करु शकतात. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे औद्योगिक प्रक्रियांमध्ये देखील ऑक्सिजनचा सर्वात स्वस्त स्त्रोत आहे. जिथे यांना ऑक्सिजन गॅस जनरेटर किंवा ऑक्सिजन जनरेशन प्लांट म्हणून ओळखलं जातं.
वातावरणात जवळजवळ 78 टक्के नायट्रोजन आणि 2 1 टक्के ऑकिस्जन आहे. याशिवाय 1 टक्के इतर वायू आहेत. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे हवेतून ऑक्सिजन फिल्टर करण्याचं काम करतं आणि नायट्रोजनसह इतर गॅस सोडण्याचं काम करतं.
ऑक्सिजनची कमतरता असल्यास मेडिकल ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरने रुग्णाला आपण ऑक्सिजन देऊ शकतो. या यंत्रातून एका नळीद्वारे ऑक्सिजनयुक्त हवा ही रुग्णापर्यंत पोहचवते. जी की, 90 ते 95 टक्के शुद्ध आहे.
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे वीज किंवा बॅटरीवर चालतं आणि ते प्रति मिनिट 1 ते 10 लीटर ऑक्सिजन फिल्टर करतं. WHO च्या 2015 च्या रिपोर्टनुसार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरला सतत संचालनासाठी डिझाइन करण्यात आलेलं आहे. हे मशीन आठड्यात सात दिवस ते देखील पाच वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त काळासाठी ऑक्सिजनचं उत्पादन करु शकतं.
Big Relief : विशाखापट्टणमहून महाराष्ट्रात पोहचली ऑक्सिजन एक्स्प्रेस
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरमधील मिळणारं ऑक्सिजन किती शुद्ध आहे? (How pure is the oxygen in the oxygen concentrator?)
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरमधून मिळणारा ऑक्सिजन हा LMO च्या 99 टक्के शुद्ध ऑक्सिजनएवढा नसतो. तज्ज्ञांच्या मते हे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर सौम्य आणि मध्यम लक्षणं असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
मात्र, जे रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत त्यांना ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर देणं हे काही योग्य नाही. एका ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरने एकापेक्षा अधिक लोकांना ऑक्सिजन देऊ शकतो. पण तज्ज्ञांच्या मते असं करमं हे चुकीचं आहे.
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन सिलेंडर हे LMO हून वेगळं कसं आहे? (How is Oxygen Concentrator, Oxygen Cylinder different from LMO?)
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे प्रति मिनिट 5 ते 10 लीटर ऑक्सिजनची निर्मिती करु शकतो. तर गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णाला प्रति मिनिट 40 ते 50 लीटर प्रति मिनिट ऑक्सिजनची गरज असते.
कन्सन्ट्रेटर हे आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. तर LMO ला आपल्या कुठेतरी स्टोअर करणं आवश्यक असतं ते देखील एका विशिष्ट तापमानावर तर ऑक्सिजन सिलेंडर हे आपल्याला भरावं लागतं.
धाराशिव साखर कारखान्यात राज्यातला पहिला ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरची नेमकी किंमत किती आहे? (How much does an oxygen concentrator cost?)
एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत ही 8 ते 20 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. पण ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरची किंमत ही 40 ते 50 हजार एवढी आहे. वीज आणि नियमित मेंटेनन्सचा देखील यामध्ये खर्च आहे.
मात्र, असं असलं तरीही तज्ज्ञांच्या मते ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरची मागणी वाढली आहे. आता दर महिन्याला याचा मागणी 30 ते 40 हजार युनिट एवढी झाली आहे. आता अशाही बातम्या समोर येत आहे की, देशात ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरची देखील कमतरता भासू लागलेली आहे. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरचे दोन मोठे उत्पादक फिलिप्स आणि बीपीएलजवळीच साठा देखील संपला आहे आणि पुढचे 15 दिवस तरी याचा पुरवठा केला जाऊ शकत नाही. (why is there so much demand for oxygen concentrators and how is it different from oxygen cylinders)
ADVERTISEMENT