Raut vs Rane: ‘तू लाचार, डरपोक..’ राणेंवर पुन्हा राऊतांची विखारी टीका

मुंबई तक

07 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:26 AM)

Sanjay Raut harsh criticism on Narayan Rane again: नाशिक: शिवसेनेच्या (Shiv Sena) आजी आणि माजी नेत्यांमध्ये रंगलेला वाद काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीए. गेल्या दोन दिवसांपासून शिवेसना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात तू-तू मैं-मैं सुरुच आहे. दोन्ही नेते एकमेकांची उणीदुणी काढून असून एकमेकांना सतत आव्हानही देत […]

Mumbaitak
follow google news

Sanjay Raut harsh criticism on Narayan Rane again: नाशिक: शिवसेनेच्या (Shiv Sena) आजी आणि माजी नेत्यांमध्ये रंगलेला वाद काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीए. गेल्या दोन दिवसांपासून शिवेसना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात तू-तू मैं-मैं सुरुच आहे. दोन्ही नेते एकमेकांची उणीदुणी काढून असून एकमेकांना सतत आव्हानही देत आहेत. अशातच आज (7 जानेवारी) नारायण राणेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिल्यानंतर राऊतांनी लागलीच नाशिकमधून (Nashik) राणेंवर पलटवार केला आहे. (you are helpless and cowardly sanjay raut harsh criticism on narayan rane again)

हे वाचलं का?

नारायण राणेंनी असा दावा केला होता की, राज्यसभेत गेल्यानंतर राऊत आणि त्यांची भेट झाली होती. त्यावेळी राऊतांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याविषयी अत्यंत गंभीर गोष्टी सांगितल्या. ज्या या दोघांना कळल्या तर ते राऊतांना चपलेने मारतील.

आता राणेंच्या याच आरोपाला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मी कधीही बेईमान, गद्दारांना भेटत नाही. त्यांचं तोंडही बघत नाही.’ असं म्हणत राणेंचे आरोप त्यांनी खोडून काढले. मात्र याशिवाय संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा राणेंचा खरपूस समाचार घेतला.

मी उद्धव ठाकरेंना भेटणार, त्यानंतर ते राऊतला चपलेने मारतील: राणे

पाहा नाशिकमधील पत्रकार परिषदेत नारायण राणे नेमकं काय म्हणाले:

‘माझ्या आयुष्यात मी नारायण राणेला कधीही भेटलो नाही. पक्ष सोडल्यावर हे सगळ्यांना माहिती आहे. मी कधीही बेईमान, गद्दारांना भेटत नाही. त्यांचं तोंडही बघत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा झाली हे चांगलं लक्षण आहे. मी निमित्त ठरत असेल त्यांना भेटण्यासाठी तर.. आताच माझं उद्धव साहेबांशी या विषयावर बोलणं या विषयावर. ते पण हसले..’

‘सुरुवात कोणी केली आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यावर अत्यंत घाणेरड्या शब्दात चिखलफेक करायची सुरुवात या माणसाने केली आहे. आम्ही नाही केली. आमच्यावर संस्कार आहेत. मी परत सांगतोय.’

‘तुम्ही पक्ष सोडलाय.. तुम्ही दुसरा मार्ग स्वीकारलाय तुम्ही शांतपणे जगा.. आमचं काय म्हणणं आहे का? तुम्ही तुमच्या कर्माने जगा आणि कर्माने मरा. आता तुम्ही आदित्य ठाकरेंवर किती घाणेरडे आरोप करता. काय पुरावे आहेत. उद्धव ठाकरेंविषयी कोणत्या भाषेत बोलता आहात. रश्मी वहिनींविषयी कोणत्या भाषेत बोलत होता.’

‘शरद पवारांना तुम्ही ज्ञान देता. कधी-काळी मोदी-शाहांना ज्ञान देत होतात. कोण आहात तुम्ही हा माझा प्रश्न आहे. आता मी त्यांचा उल्लेख अहो-जावो करतो. पण परत सांगतो. आमच्या नादाला यापुढे लागलात कोणीही तर तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत.’

‘फार धमक्या, दादागिरी करु नका. आमचं अख्खं आयुष्य रस्त्यावर गेलंय. तू कधी रे कानफडात खाल्लीस? खाल्ली का.. मोठी भाईगिरी दाखवतोय आम्हाला. या दाखवतो.’ न

‘राणे तुला पूर्ण नागडा करीन…’, राऊतांच्या संयमाचा स्फोट; काय घडलं?

‘माझ्या माहितीनुसार, त्यांचं केंद्रीय मंत्रिपद जातंय. कारणं खूप आहे. नवीन गट निर्माण झाला आहे त्यांच्या काही लोकांना सामावून घ्यायचं आहे महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात. असं मी ऐकतोय. अशावेळी कोणाला तरी काढावं लागेल. यांचा परफॉर्मन्स शून्य आहे असं मी ऐकलं. पीएमओकडे आमचीही माणसं असतात. आम्हालाही माहिती देत असतात.’

‘तुम्ही ज्या पक्षात गेला आहात त्या पक्षाशी इमान राखा. आमच्यावर घाणेरडे आरोप करणं म्हणजे इमान नाही. पण निष्ठा… बाडगा असतो ना बाडगा हा मोठ्याने बांग देतो. असं बाळासाहेब बोलायचे. तो सिलेंडर त्याच जास्त उंच करतो त्याचा. तसं हे चाललंय.’

‘तुम्ही आमच्याविरुद्ध उभे राहिलात तेव्हाही आम्ही काही काळ संयम राखला. पण तुम्ही आता मर्यादा सोडली. म्हणून आम्हाला हात सोडावे लागले. तुम्ही आमची काय उखडणार आहात. तू कोण आहे.. तू काय करणार.. लाचार माणूस आहेस. दहा पक्ष बदलतो घाबरुन.. डरपोक.. डरपोकांना घाबरण्याचं कारण नाही आम्हाला.’ असं म्हणत संजय राऊतांनी पुन्हा एकदा डिवचलं आहे. त्यामुळे राऊतांच्या या टीकेला राणे कशा पद्धतीने उत्तर देतात याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

    follow whatsapp