Ajit Pawar : शरद पवारांवरील ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचा खुलासा, ‘ज्येष्ठ नेत्यांनी…’

प्रशांत गोमाणे

05 Feb 2024 (अपडेटेड: 05 Feb 2024, 02:05 PM)

Ajit Pawar Reaction on Sharad Pawar Statement : अजित पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) ‘काकाच्या मृत्यूची वाट बघताय’ अशी टीका केली होती. या टीकेनंतर अजित पवारांवर जोरदार टीका झाली होती.अखेर त्या वक्यव्यावर आता अजित पवारांनी (Ajit Pawar) खुलासा केला आहे.

ajit pawar disclosure on sharad pawar statement baramati rally jitendra awhad maharashtra politics

ajit pawar disclosure on sharad pawar statement baramati rally jitendra awhad maharashtra politics

follow google news

Ajit Pawar Reaction on Sharad Pawar Statement : राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीतून बोलताना शरद पवारांना चांगलंच डिवचलं होतं.अजित पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) ‘काकाच्या मृत्यूची वाट बघताय’ अशी टीका केली होती. या टीकेनंतर अजित पवारांवर जोरदार टीका झाली होती.अखेर त्या वक्यव्यावर आता अजित पवारांनी (Ajit Pawar) खुलासा केला आहे. (ajit pawar disclosure on sharad pawar statement baramati rally jitendra awhad maharashtra politics)

हे वाचलं का?

‘माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला’

अजित पवारांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट करून खुलासा दिला आहे. काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे, असे अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा : Lok Sabha : PM मोदींचा जोरदार हल्लाबोल, ‘घराणेशाहीमुळे काँग्रेसच्या दुकानाला टाळं…’

पण काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही, असे म्हणत अजित पवारांनी आव्हाडांना सुनावले. तसेच सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे, असा खुलासा अजित पवारांनी दिला.

आव्हाडांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले. जाऊ द्या कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच..नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती. त्यामुळे नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात, असा सवाल आव्हाडांनी अजित पवारांना केला. तसेच ‘कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते’, असा टोला देखील आव्हाडांनी अजित पवारांना लगावला.

हे ही वाचा : Baramati Lok Sabha : सुप्रिया सुळेंविरुद्ध अजित पवार ‘या’ नेत्याला उतरवणार मैदानात?

काकाच्या मृत्यूची वाट बघताय

जितेंद्र आव्हाड एबीपी माझावर बोलत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. ‘एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची प्रार्थना करणे कितपत योग्य आहे. हे माणूसकीला शोभणारे आहे का?’ असा संताप जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला होता. ‘अजित पवारांनी आजच हद्दच ओलांडली. आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघतोय, हे राजकारण आहे का अजित पवार? भावनिक आवाहन करताय. महाराष्ट्रालाही कळेल काय माणूस आहे हा’, अशी टीका आव्हाडांनी अजित पवारांवर केली.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुती लवकरच आपला उमेदवार जाहीर करेन. मी उमेदवार समजून मला मतदान केलं पाहिजे, अशी तंबी कार्यकर्ते आणि मतदारांना देतानाच, काही लोक भावनिक होतील, माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगतील, पण खरंच ती शेवटची निवडणूक असेल का? असा सवाल करत अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात फटकेबाजी केली होती.

    follow whatsapp