NCP : ‘पवार साहेब आदरणीय पण माझे नेते…’, प्रफुल पटेलांचं खळबळजनक विधान

प्रशांत गोमाणे

05 Oct 2023 (अपडेटेड: 05 Oct 2023, 04:22 PM)

इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये तुमचा नेता कोण? असा सवाल प्रफुल पटेल यांना विचारण्यात आला. या प्रश्नासोबत त्यांनी तीन पर्याय देखील देण्यात आले होते. पर्याय नंबर 1)अजित पवार 2) शरद पवार ३) नरेंद्र मोदी, असे पर्याय देण्यात आले.

ajit pawar group ncp mp praful patel big statement sharad pawar narendra modi india today conclave mumbai 2023

ajit pawar group ncp mp praful patel big statement sharad pawar narendra modi india today conclave mumbai 2023

follow google news

India Today Conclave Mumbai Praful Patel : इंडिया टुडेच्या मुंबईतील कॉनक्लेवच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल चर्चेसाठी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रावादीतील फुट आणि इतर अनेक मुद्यावर प्रफुल पटेल यांनी दिलखुलास उत्तर दिली. यावेळी प्रफुल पटेलांना तुमचा नेता कोण ? असा प्रश्न विचारण्यात आला होता.यासाठी त्यांना अजित पवार, शरद पवार, नरेंद्र मोदी असे तीन पर्यायही देण्यात आले होते. यामधील एक पर्याय निवडून त्यांनी खळबळजनक विधान केले. (ajit pawar group ncp mp praful patel big statement sharad pawar narendra modi india today conclave mumbai 2023)

हे वाचलं का?

प्रफुल पटेल शरद पवारांसोबत सावली सारखे असतात, अशी त्यांची राष्ट्रवादीत ओळख होती. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही सावली आता विरली असल्याचं बोललं जात आहे. त्यात इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये तुमचा नेता कोण? असा सवाल प्रफुल पटेल यांना विचारण्यात आला. या प्रश्नासोबत त्यांनी तीन पर्याय देखील देण्यात आले होते. पर्याय नंबर 1)अजित पवार 2) शरद पवार ३) नरेंद्र मोदी, असे पर्याय देण्यात आले.

हे ही वाचा : दारुची पैज जीवावर बेतली!, 2 लाख कमवण्याच्या नादात धक्कादायक अंत

या प्रश्नावर उत्तर देताना प्रफुल पटेल म्हणाले, पवार साहेब माझ्यासाठी आदरणीय आणि वंदनीय नेते आहेत. पण नेता, देशाचे नेता आणि भविष्याचे नेते नरेंद्र मोदी आहेत, ज्यांच्यां सोबत सध्या मी आहे, असं खळबळजनक विधान प्रफुल पटेल यांनी केले.त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा : भाजपने काय दिली होती ‘ऑफर’?; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात भूकंप

शरद पवारांचा दावा खोडून काढला

इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये प्रफुल पटेलांना प्रश्न करण्यात आला की, राष्ट्रवादीच्या 6-7 आमदार आणि खासदारांनी शरद पवारांकडे भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जर भाजपसोबत नाही गेलो तर ईडी आपल्याला जेलमध्ये टाकेल. त्यामुळे ईडीच्या भितीपोटीच तुम्ही भाजपसोबत गेलात.शरद पवारांनीच बुधवारच्या चर्चेत इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये दावा केला होता. हाचा दावा प्रफुल पटेलांनी खोडून काढला आहे. भाजपसोबत जाण्याबाबत अनेकदा चर्चा झाली होती. ६-7 लोकांना त्रास होता म्हणून गेलो यात तथ्य काहीच तथ्य नसल्याचे म्हणत पटेलांनी शरद पवारांचा दावा खोडून काढला.

    follow whatsapp