Akshay shinde : ''गृह विभागाचा हलगर्जीपणा संशयास्पद...'', अक्षय शिंदें एन्काऊंटरवर पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

23 Sep 2024 (अपडेटेड: 23 Sep 2024, 09:42 PM)

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटरच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता शरद पवारांनी या घटनेवर प्रतिक्रिया समोर आहे. आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

akshay shinde encounter badlapur rape case sharad pawar reaction badlapur new two school girl rape case

शासन दुर्बल ठरलंय

follow google news

बातम्या हायलाइट

point

कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय

point

गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा

point

या घटनेची सखोल चौकशी व्हावी

Sharad Pawar On Akshay Shinde Encounter :  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची घटना घडली आहे. पोलिस व्हॅनमधून जाताना अक्षय शिंदेने बंदूक हिसकावून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या दरम्यान सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता शरद पवारांनी या घटनेवर प्रतिक्रिया समोर आहे. आरोपीला  स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.  (akshay shinde encounter badlapur rape case sharad pawar reaction badlapur new two school girl rape case)

हे वाचलं का?

शरद पवारांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर भाष्य केले आहे. ''बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद असल्याचे'' शरद पवारांनी म्हटले आहे.

शरद पवारांचं ट्विट जसंच्या तसं...

''बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे. 

 

घटनेची निवृत्ती न्यायमुर्तीमार्फत चौकशी व्हावी 

अक्षय शिंदेचे दोन्ही हात बांधले असतील तर तो गोळी कशी झाडणार? ज्या शाळेचा हा विषय आहे ती आरएसएस आणि भाजपशी संबंधित लोकांची आहे. सुरुवातीला ही घटना दडपण्याचा प्रयत्न झाला.. आता या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. 

    follow whatsapp