Anil Deshmukh : "वाझेला हाताशी धरून फडणवीस...", हायकोर्टाचा निकाल दाखवत देशमुखांचा गंभीर आरोप

योगेश पांडे

• 11:22 AM • 03 Aug 2024

Anil Deshmukh News : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझेने केलेल्या आरोपांना अनिल देशमुख यांनी उत्तर दिले.

अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

अनिल देशमुख, देवेंद्र फडणवीस, सचिन वाझे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

सचिन वाझेच्या आरोपावर अनिल देशमुख यांचा खुलासा

point

सचिन वाझेला देवेंद्र फडणवीसांनी हाताशी धरल्याचा आरोप

point

अनिल देशमुख यांनी हायकोर्टाचे निकाल दाखवला वाचून

Anil Deshmukh Sachin Vaze : अनिल देशमुख यांना त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे दिले जात होते. याचे पुरावे आहेत. देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे, असा दावा सचिन वाझेने केला. सचिन वाझेच्या विधानामागे फडणवीस असल्याचा दावा करत अनिल देशमुख यांनी भूमिका मांडली आहे. (Anil Deshmukh On Sachin vaze Statement 100 crore extortion case)

हे वाचलं का?

सचिन वाझेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्याने अनिल देशमुख यांना पैसे दिल्याचा आरोप केला आहे. पीएच्या माध्यमातून अनिल देशमुखांकडे पैसे जात असल्याचा दावा वाझेने केला आहे. 

अनिल देशमुख, सचिन वाझे आणि १०० कोटी वसुली प्रकरण

अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप आहे. याच प्रकरणात आता सचिन वाझेने विधान केले. त्याला नागपूर येथे माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी उत्तर दिले. 

देशमुख म्हणाले, "मी चार-पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले आणि वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती. देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंना तुरुंगात टाकण्यासाठी, आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकण्यासाठी कशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र करून देण्यासाठी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला होता.

हेही वाचा >> जयंत पाटील अडकणार? फडणवीसांना पत्र, राजकीय वर्तुळात खळबळ  

"ही गोष्ट मी महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझे जे बोलले, ती फडणवीस यांची नवीन चाल आहे", असा दावा देशमुख यांनी केला आहे.

हेही वाचा >> माढ्यात मोहितेंनंतर पवारांचा दुसरा डाव! अजितदादांना धक्का, शिंदेंना घरातूनच चॅलेंज? 

"देवेंद्र फडणवीस यांना बहुतेक माहिती नाही की, मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाझेबद्दल बोलताना हे सांगितलं आहे की, सचिन वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याला दोन खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे. आता सुद्धा तो एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तो विश्वास ठेवण्यालायक नाही. त्याच्या विधानावर विश्वास ठेवता येत नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे", असे देशमुख म्हणाले.

फडणवीसांनी वाझेला माझ्यावर आरोप करायला सांगितले -देशमुख

"अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर सचिन वाझेच्या माध्यमातून आरोप लावताहेत. जनतेला मी हे सांगू इच्छितो की, मी जे फडणवीसांवर आरोप लावले आणि त्यांनी सचिन वाझेला माझ्यावर आरोप करायला सांगितले आहे", अशी भूमिका देशमुख यांनी मांडली आहे. 

    follow whatsapp