ठाणे: राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (27 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यावेळी ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे काळजीवाहू असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही पत्रकार परिषद 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी नाही तर त्यांच्या ठाण्यातील शुभ-दीप बंगल्यावर बोलावली आहे. त्यामुळेच आता राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, या पत्रकार परिषदेत ते एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. (who is maharashtra new cm will eknath shinde make a big announcement at 3 pm called urgent press conference)
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे करणार मोठी घोषणा?
23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मात्र, तीन दिवस उलटून गेल्यानंतरही राज्यातील नवा मुख्यमंत्री कोण असणार याची घोषणा महायुतीकडून करण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली त्यामुळे तेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी शिवसेना नेते आणि कार्यकर्ते करत आहे.
हे ही वाचा>> ladki Bahin Yojana: महिलांनो! 'या' महिन्यात मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 6 व्या हफ्त्याचे 1500?
तर दुसरीकडे भाजपला प्रचंड मोठ्या प्रमाणात विजय मिळाला असून ते जवळजवळ बहुमतापर्यंत पोहचले आहेत. अशावेळी आता भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी केली जात आहे.त्यामुळे अद्यापही मुख्यमंत्री कोण होणार याचा तिढा काही सुटलेला नाही.
या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच कालपासून एकनाथ शिंदे हे आपल्या ठाण्यातील निवासस्थानी परतले आहेत. तसेच त्यांनी आपल्या सर्व आमदारांना देखील त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात जाण्यास सांगितलं असल्याचं समजतं आहे.
हे ही वाचा>> IPL 2025 : कोण असेल KKR चा नवा कर्णधार? कोलकाता संघाच्या सीईओंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप पक्षश्रेष्ठी सुद्धा हे त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांची एक प्रकारे कोंडी झालेली आहे. अशावेळी ते आजच्या पत्रकार परिषदेतून नेमकी काय घोषणा करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरून अनेक तर्क-वितर्क आणि चर्चा सुरू असताना आता या पत्रकार परिषदेत शिंदे काय बोलणार आणि काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील आग्रही आहेत. अशावेळी अचानक पत्रकार परिषद बोलावून शिंदे नेमकं काय बोलणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
ADVERTISEMENT