Ambadas Danve : राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला महायुतीने अक्षरश: धूळ चारल्याचं दिसतंय. या पराभवाच्या कारणांवर बोलताना अंबादास दानवे यांनी काँग्रेस नेतृत्वावर सडकून टीका केली आहे. तसंच जागावाटपात भरपूर वेळ वाया गेल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. त्यामुळे कालपर्यंत इव्हीएमवर होणाऱ्या चर्चेमध्ये आता महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वााचा >>Shrikant Shinde : "पण शिंदे साहेब अपवाद ठरले...", मोदी-शाहांचा उल्लेख करत श्रीकांत शिंदेंची बापासाठी भावनिक पोस्ट
अंबादास दानवे काय म्हणाले?
सर्व्हेच्या नावाखाली काँग्रेसने ज्या जागा घेतल्या, तिथे त्यांना त्यांचं डिपॉझिटही वाचवता आलं नाही. त्यांना संभाजीनगरमध्ये फक्त 5500 मतं मिळाली. मात्र दुसरीकडं काँग्रेस नेते मंत्रिपदासाठी सूट घालून तयार होते, असं म्हणत अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसला अतिआत्मविश्वास होता. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महत्त्व देत नव्हता असाही आरोप दानवे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही प्रचार करण्याऐवजी जागांबद्दलच चर्चा करत राहिलो, त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला असं दानवे म्हणाले आहेत.
शिवसेना स्वतंत्र लढणार?
हे ही वाचा >> Nana Patole :"जनतेची मतं चोरण्याचा आणि डाका टाकण्याचं काम...", नाना पटोलेंनी सांगितली A to Z स्टोरी
अंबादास दानवे यांनी काल माध्यमांशी बोलताना आणखी एका महत्वपूर्ण विषायवर भूमिका मांडली. कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची इच्छा असल्याचं ते म्हणाले होते. शिवसेनेने स्वतंत्र लढलं पाहिजे असा बऱ्याच लोकांचा सूर आहे, शिवसेनेचा एक विचार आहे, शिवसेना फक्त सत्तेसाठी नाही, सत्ता ही शिवसेनेला मिळणारच आहे असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. कार्यकर्ते भावना व्यक्त करत असतात, ते नेत्यांनी ऐकलं पाहिजे. ही भावना नेत्यांनी ऐकली आहे असं दानवे म्हणाले.
अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावर स्पष्ट बोलत, अनेक गोष्टींवर पडदा टाकला आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीमध्ये झालेला बेबनावच त्यांच्यासाठी नुकसान करणारा ठरल्याचं आता स्पष्ट होतंय. निवडणुकीपूर्वी जागा वाटपाच्या चर्चा सुरू असताना अनेकदा बैठकीत नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या शाब्दिक वाद झाल्याचं सांगण्यात येतं होतं. मात्र दोन्हीही नेते त्या वादावर पडदा टाकताना दिसले होते.
ADVERTISEMENT