Aziz Qureshi controversial statement : ‘काँग्रेसचे काही लोक हिंदू धर्मातील धार्मिक यात्रांबद्दल बोलतात. ते गंगा मैया की जय, नर्मदा मैया की जय अशा घोषणा देतात. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. बुडून मरावं अशी गोष्ट आहे’, असं विधान केलंय अजिज करेशी यांनी. ते असंही म्हणाले की, ‘एक-दोन कोटी मुस्लिम मेले तर काही फरक पडत नाही.’ कुरेशी हे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते आहेत.
ADVERTISEMENT
एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, “जर मला काँग्रेसमधून काढायचे असेल, तर मला काढून टाका, पण पक्ष कार्यालयात मूर्ती बसवणे म्हणजे बुडून मरावं असंच आहे. मला कसलीही भीती नाही. मला पक्षातून काढून टाका. आज नेहरूंचे वारसदार, काँग्रेसचे लोक धार्मिक मिरवणुका काढतात, ‘जय गंगा मैया’ म्हणतात, मी हिंदू आहे, असे अभिमानाने सांगतात. ते काँग्रेस कार्यालयात मूर्ती बसवतात. हे पाण्यात बुडून मरण्यासारखंच आहे.”
मुस्लिम पक्षांचे गुलाम नाहीत – अजीज कुरेशी
माजी राज्यपाल अजीज कुरेशी यांनी कडक शब्दात सांगितले की, काँग्रेससह देशातील सर्वच पक्षांना मी त्यांना सांगू इच्छितो की मुस्लिम हे तुमचे गुलाम नाही, हे त्यांनी चांगले समजून घेतले पाहिजे. मुस्लिमांनी तुम्हाला मतदान का करावे, तुम्ही नोकऱ्या देत नाही, तुम्ही पोलीस, लष्कर, नौदलात घेत नाही, मग मुस्लिमांनी तुम्हाला मतदान का करावे? असा सवाल त्यांनी केलाय.
’22 कोटी मुस्लिम…’
वादग्रस्त भाषण करताना अजीज कुरेशी म्हणाले की, 22 कोटी मुस्लिमांपैकी एक-दोन कोटी मेले तरी हरकत नाही. ते म्हणाले, “जेव्हा पाणी डोक्याच्या वर जाईल, तेव्हा लक्षात घ्या की, मुस्लिमांनी हातात बांगड्या घातलेल्या नाहीत.”
तुमच्या विधानावर ठाम राहा : अजीज कुरेशी
दुसरीकडे, आज तकशी बोलताना ते म्हणाले की, “मी माझ्या विधानावर ठाम आहे. देशातील मुस्लिम भीतीच्या छायेखाली जगत असल्याने मी हे बोललो आहे. मुस्लिमांना घाबरवले जात आहे.”
वाचा >> Onion Price : ‘वाजपेयींचं सरकार पडले म्हणून इतके घाबरता का?’, बच्चू कडू मोदी सरकारवर कडाडले
काँग्रेसच्या धार्मिक कार्यांना उत्तर देताना ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष मधेच हिंदुत्वावर बोलायला लागतो, जे चुकीचे आहे. जसे काँग्रेस कार्यालयात पूजा करणे, मूर्ती बसवणे, जय श्री रामचा नारा लावणे, ही नेहरूंच्या स्वप्नाची हत्या आहे. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, पण काही लोक त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या भाषणाची भीती वाटते: कुरेशी
अजीज कुरेशी म्हणाले की, “पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या भाषणाला लोक घाबरतात असे या देशात यापूर्वी कधीच घडले नाही आणि मी म्हणत आहे की भारतातील मुस्लिम ‘मृत्यूच्या सावटाखाली’ जगत आहेत. घरांवर चालणारे बुलडोझर किंवा ज्या चकमकी होत आहेत. मी असे म्हणत नाही की हे फक्त मुस्लिमांवर होत आहे, परंतु कारवाईचे प्रमाण ते मुस्लिमविरोधी असल्याचे दर्शवते.”
वाचा >> Tejas Thackeray : पश्चिम घाटात ठाकरेंनी शोधला नवा साप, नावाचा अर्थ आहे खास
अजीज कुरेशी होते तीन राज्यांचे राज्यपाल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजीज कुरेशी हे उत्तराखंड तसेच उत्तर प्रदेश आणि मिझोरामचे राज्यपाल राहिले आहेत. त्यांची मध्य प्रदेश सरकारने 24 जानेवारी 2020 रोजी एमपी उर्दू अकादमीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. अजीज कुरेशी यांनी 2015 मध्ये काही महिने मिझोरामचे राज्यपालपद भूषवले होते. याशिवाय त्यांनी उत्तराखंडचे राज्यपाल म्हणूनही काम केलेले आहे. कुरेशी यांना एका महिन्यासाठी यूपीचे राज्यपालपद (अतिरिक्त प्रभार) देण्यात आला होता. याशिवाय कुरेशी हे मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत ते सतना येथून खासदार म्हणूनही निवडून आले होते.
ADVERTISEMENT