Baba Siddique : 'या' घरात शिजत होता सिद्दीकीच्या हत्येचा कट, मुंबईतला VIDEO आला समोर

मुंबई तक

14 Oct 2024 (अपडेटेड: 14 Oct 2024, 11:06 PM)

Baba Siddique Case Update: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता मुंबई पोलिसांनी त्या घराचा शोध लावला आहे. ज्या घरात हे सिद्दीकींचे मारेकरी लपले होते. याच घरात सिद्दीकीच्या हत्येचा कट शिजत होतं? हे घर मुंबईत नेमकं कुठं आहे? आणि घटनास्थळापासून किती दुर होतं? याबाबतची आता मोठी माहिती समोर आली आहे.

 baba siddique case update kurla mumbai where conspiracy to murder baba siddique was hatched

मुंबईतला VIDEO आला समोर

follow google news

बातम्या हायलाइट

point

सिद्दीकीचे शूटर 'या' खोलीत राहायचे?

point

'या' खोलीत शिजत होता हत्येचा कट

point

खोलीचा व्हिडिओ आला समोर

Baba Siddique Case Update: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता मुंबई पोलिसांनी त्या घराचा शोध लावला आहे. ज्या घरात हे सिद्दीकींचे मारेकरी लपले होते. याच घरात सिद्दीकीच्या हत्येचा कट शिजत होतं? हे घर मुंबईत नेमकं कुठं आहे? आणि घटनास्थळापासून किती दुर होतं? याबाबतची आता मोठी माहिती समोर आली आहे. (baba siddique case update kurla mumbai where conspiracy to murder baba siddique was hatched) 

हे वाचलं का?

बाबा सिद्दीकी यांचे मारेकरी कुर्ला परिसरात राहत होते. बांद्र्यापासून साधारण 6 किलोमीटर दुर असलेल्या भाड्याच्या खोलीत हे हल्लेखोर वास्तव्यास होते. याच खोलीत राहुन हल्लेखोरांनी सिद्दीकींच्या हत्येचा कट रचला होता. या खोलीची व्यवस्था मोहम्मद झिशान अख्तर या आरोपीने केली होती,अशी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळतेय.आरोपींना मुंबईत आणण्यात आणि त्यांना इतर सगळ्या वस्तु पुरवण्यात याच झिशानचा हात होता. तब्बल 40 दिवस याच घरात हल्लेखोर राहिले होते. आणि चार आठवड्यांपासून सिद्दीकी यांच्या घराची आणि मुलाच्या कार्यालयाची रेकी करत होते. या खोलीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.  

हे ही वाचा : Baba Siddique : तुरुंगात रचला सिद्दीकींच्या हत्येचा कट! 4 आठवडे रेकी, 3 शूटर 6 गोळ्या..., हत्याकांडात आतापर्यंत काय काय घडलं?

झिशान देत होता शूरटना डायरेक्शन 

तीनही शूटरना झिशान अख्तर देत होता डायरेक्शन. ज्यावेळेस बाबा सिद्दीकी ऑफिसबाहेर पडले त्यावेळेस झिशाननेच शूटरना डायरेक्शन देऊन सिद्दीकींवर गोळीबार करायला लावला होता. यामध्ये तीनही शुटरने 6 गोळ्या झाडल्या होत्या. यापैकी सिद्दीकींच्या पोटात 2 आणि छातीत एक गोळी लागली होती. या हल्ल्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली होती. 

तिघांना अटक आणि तीन मोकाट

आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरून धर्मराज कश्यप, गुरुमेल सिंह यांना अटक केली होती. या दोघांसोबतचा शिवा गौतम हा फरार झाला होता. या तिघांना डायरेक्शन देणारा मोहम्मद झिशान अख्तर याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी शुबू लोणकरचा भाऊ प्रविण लोणकरलाही अटक केली आहे. शुबू लोणकर अद्याप पोलिसांच्या हाती आला नाही. त्यामुळे तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत तर तिघे फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सूरू आहे. 

    follow whatsapp