Maharashtra Political News : ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरबाजी काही दिवसांपूर्वी उत्साही कार्यकर्त्यांनी केली होती. या जाहिरातबाजीनंतर ”केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र” अशी घोषणा राज्यात संपुष्ठात आल्याची चर्चा सुरु झाली होती. तसेच देवेंद्र फडणवीस आणि मु्ख्यमंत्र्यांमध्ये बिनसल्याचे बोलले जात होते. या दरम्यान फडणवीसांच्या कानाचे दुखणेही समोर आले होते. मात्र नंतर पालघरच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ती जाहिरात म्हणजे मुर्खपणा असल्याचे विधान केले आहे. या त्यांच्या विधानाची आता चर्चा सुरु झाली आहे. (bjp devendra fadnvis clearly speaks on cm shinde popularity advertisement maharashtra politics)
ADVERTISEMENT
उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डीडी नॅशनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी त्या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्षात कमी डोक्याचे लोक असतात. काही लोक सायकोफंड असतात, अशाच एका व्यक्तीने ही जाहिरात दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत,जर ते प्रसिद्ध आहेत, तर आमची सरकारही प्रसिद्ध आहे. त्यामुळे यात मला दुखी वाटण्याचे काहीच कारण नाही,असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हे ही वाचा : ‘..तर मी विकेट घेणारच ना’, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचे गौप्यस्फोट; फडणवीसांना टोले
जाहिरात ज्या प्रमाणे दिली गेली होती, हा एक प्रकारचा मुर्खपणाच होता. शिंदेनी स्वत: मला फोन करून सांगितले, ‘माझ्या इथल्या लोकांनी चुकी केली. मी नाही मानत, ही गोष्ट बरोबर नाही आहे. त्यामुळे माझ्यासाठी तिकडेच विषय संपला होता. पण माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना राग होता. आता या सगळ्या गोष्टी संपल्या आहेत, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जय वीरूमध्ये कोणताही मतभेद नाही. दोघांमध्ये चांगले संबंध आहेत, सरकारमध्ये मिळून काम करतो आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता.
‘एखाद्या जाहिरातीने सरकार पडणार नाही’
देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलताना भाषणाची सुरुवातच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी केली होती. पुढे ते जाहिरात वादावर बोलताना म्हणाले, एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे हे सरकार पडेल असे अनेकांना वाटले होते. हे सरकार तकलादू नाही आहे, असे स्पष्ट उत्तर फडणवीस यांनी दिले. तसेच हे जुने सरकार नाही आहे, कोणी आधी भाषण करायचं आणि कोणी नंतर भाषण करायचं. याच्याकरता एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही बघितले, अशी टीका फडणवीसांनी विरोधकांवर केली होती.तसेच आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी किंवा पद मिळवण्यासाठी हे सरकार तयार केले नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनात गुणात्मक बदल घडविण्यासाठी हे सरकार अस्तित्वात आले आहे, असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT