Devendra Fadnavis on BJP: नागपूर: भाजप स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की, भाजप हा देशातील एकमेव पक्ष आहे की, ज्यामध्ये कधीही उभी फूट पडली नाही. हा पक्ष एकसंध राहिला. पाहा याचविषयी देवेंद्र फडणवीस नेमकं काय-काय म्हणाले. (bjp is the only party in the country which has never had a split saying this dcm devendra fadnavis has also indirectly targeted opponents)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांचं नागपूरमधील ते भाषण जसंच्या तसं..
'भारतामध्ये ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार, ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार, ज्या पक्षाचे सर्वात जास्त विधान परिषद सदस्य.. ज्या पक्षाचे सर्वात महापौर आणि ज्या पक्षाचे सर्वात स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य असा देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिलं जातं.'
हे ही वाचा>> कल्याणचा उमेदवार थेट फडणवीसांनीच केला जाहीर!
'मोदीजींच्य नेतृत्वात भाजपने केवळ भारतातच नव्हे तर पंतप्रधान पदाच्या माध्यमातून भाजपची एक प्रतिमा तयार केली आहे.'
'भाजपने जी वाटचाल सुरू केली.. पहिल्यांदा जनसंघाच्या रुपाने आणि आता भाजपच्या रुपाने.. देशाच्या इतिहासात एकच असा राष्ट्रीय पक्ष आहे की, ज्या पक्षामध्ये कधीच उभी फूट पडली नाही. आपण देशातील कोणताही पक्ष बघा.. तरी त्या पक्षात कधी ना कधी उभी फूट पडली.. काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की, त्या मोजता येणार नाही. कम्युनिस्ट पक्षात फूट पडली, समाजवादी पक्षाचीही अनेक शकलं झाली. पण भाजप हा एकमेव पक्ष आहे की, हा पक्ष तयार झाल्यापासून आजपर्यंत या पक्षात कधीच फूट पडली नाही. हा पक्ष एकसंध राहिला.'
'या पक्षात फूट पडली नाही याचं एकमेव कारण म्हणजे या पक्षाचे नेते हे कधी आत्मकेंद्री किंवा स्वार्थी नव्हते. हा पक्ष कोणाला तरी पंतप्रधान बनविण्याकरिता किंवा कोणाला तरी मुख्यमंत्री बनविण्याकरिता.. कोणाला खुर्ची देण्याकरिता तयार झाला नाही. एका विचाराकरिता तो तयार झाला. विचारावर चालणारा पक्ष म्हणून या पक्षात कधीही उभी फूट पडली नाही. विचाराने काम करता करता आज पक्ष कुठपर्यंत पोहचलाय हे आपण पाहिलाय.'
'लोकं या पक्षाला हिणवायचे. इंदिराजींच्या हत्येनंतरच्या निवडणुकीत एक सहानभूतीची लाट आली आणि आपले केवळ दोन लोकं निवडून आले. तेव्हा आपल्याला हिणवलं जायचं. त्या दोनपासून 302 पर्यंत भाजपचा प्रवास हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाला.'
हे ही वाचा>> रोहित पवारांकडून खेकड्याचा छळ, PETA ने केली कारवाईची मागणी! नेमकं प्रकरण काय?
'ज्या गोष्टी अटलजींच्या काळात आपल्या पाहिल्या त्याला कळसापर्यंत नेण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाचं आणि नेतृत्वाचं बरंच कौतुक केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या वक्तव्यातून एक प्रकारे विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणाच साधला आहे. राज्यात मागील दोन वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. त्यानंतर दोन्ही पक्षातील बहुतांश आमदार आणि खासदार हे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. मात्र, याच फुटीनंतर राज्यातील राजकारण हे पूर्णपणे बदलून गेलं आहे.
ADVERTISEMENT