Vinod Tawade, Bjp loksabha candidate first list : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आज पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 195 उमेदवारांचा समावेश होता. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर विनोद तावडेंची खूप चर्चा रंगतेय. यामागच कारण म्हणजे, एकेकाळी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं आणि आज तेच विनोद तावडे दिल्लीतून भाजपची लोकसभेची उमेदवारी घोषित करतायत. त्यामुळे विधानसभेचं तिकीट कापण्यापासून ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव होण्यापर्यंतच तावडेंचा नेमका प्रवास कसा होता? हे जाणून घेऊयात. (bjp loksabha candidate first list announce vinod tawade pm narendra modi contets varanasi lok) sabha election 2024
ADVERTISEMENT
2019 मध्ये आधी विनोद तावडे यांच्याकडून महत्वाच पद काढून घेण्यात आलं, त्यानंतर त्यांच विधानसभा निवडणुकीच तिकीट कापलं गेलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात विनोद तावडे यांचे पंख छाटल्याची चर्चा सूरू होती. मात्र पक्षाने विनोद तावडेंचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पातळीवर सक्रिय केले.
हे ही वाचा :महाराष्ट्रातील फक्त 'एका' नेत्याची उमेदवारी जाहीर, पण..
तावडे राष्ट्रीय पातळीवर सक्रिय झाल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या. या जबाबदाऱ्या तावडेंनी चोखपणे बजावल्या. त्यामुळे भापजकडून त्यांना आणखीण जबाबदाऱ्या मिळत गेल्या. यानंतर पक्षाने भाजपच्या मिशन 2024 साठी एका महत्वाच्या समितीवर तावडेंची नियुक्ती केली. इतकच नाही तर भाजपच्या 2024 च्या पायाभूत नियोजनासाठी एक समिती नेमली गेली. या समितीत तावडे निमंत्रक म्हणून होते. या समितीत तावडेंवर लोकसभेच्या प्रचारासाठी केंद्र ठरवणे, राज्य पातळीवर नेत्यांचे दौरे ठरवणे, ज्या जागेवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिथे उमेदवार निश्चित करण्याची महत्वाची जबाबदारी होती. ही जबाबदारी देखील त्यांनी चोख बजावली आहे.
दरम्यान पक्षाने डावलल्यानंतर विनोद तावडे खचले नाही. आपल्या मनातली खदखद ही त्यांनी कधी व्यक्त केली नाही. पक्ष देईल ती जबाबदारी ते चोख बजावत गेले. राज्याच्या राजकारणात त्यांनी त्यांची छाप सोडलीच, मात्र दिल्लीतही त्यांनी आपली मोहर उमटवली.
ADVERTISEMENT