Suresh Dhas On Dhananjay Munde : संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या केल्याचे चार्जशीटमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाची पाळेमुळे खणून काढली. धस यांनी या प्रकरणाचा जोरदार पाठपुरावा केल्यानं मुंडेंना राजीनामा द्यावा लागला असं बोललं जात आहे. अशातच सुरेश धस यांनी मुंबई तकच्या चावडीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठं विधान केलं आहे. धस म्हणाले, "ज्यावेळी चार्जशीट दाखल झालं आणि त्या चार्जशीटमधले फोटो बाहेर आले. फोटो बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री विधानभवनातून बाहरे निघाले आणि सह्याद्री गेस्ट हाऊसवर पोहोचले. तिथे त्यांनी अजितदादा, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, धनंजय मुंडे यांना बोलवून घेतलं आणि स्पष्टपणे सांगितलं की उद्या सकाळी तुम्ही राजीनामा देऊन टाका. त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी अजितदादांकडे राजीनामा दिला. दहा वाजता मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवून दिला".
ADVERTISEMENT
सुरेश धस संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाबाबत काय म्हणाले?
सुरेश धस म्हणाले, "या सहकाऱ्यांनी कशा पद्धतीने संतोष देशमुख यांना संपवलं आहे, याचं वर्णन 16 डिसेंबर 2024 च्या माझ्या भाषणात आलं होतं. माध्यमांनाही मी त्याचं वर्णन आधीच सांगितलं होतं. मस्साजोग आणि तेथील अवतीभवतीची गावं त्या गावात गेल्यावर लोकांनी ठामपणे सांगितलं होतं की, हे असं असं झालंय. संतोषला ज्या पद्धतीने मारलंय, त्यानंतर बीडचे सीएस थोरात यांना मी विचारलं की, संतोषच्या मृत्यूनंतरचा रिपोर्ट नेमका काय आहे..त्यावेळीच त्यांनी मला कल्पना दिली होती की, अतिशय विचित्र पद्धतीनं मारलं गेलंय. आम्ही राजकारणी लोक आहोत. आम्ही लोकांमध्ये राहतो. लोकांनी सांगितलेलं वर्णन ग्रास्पिंग पावरने आमच्या झटकन लक्षात आलं. तरच आम्ही राजकीय नेते..नाहीतर लोकांनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडायचं.. असं जर राजकारणात केलं. तर ते लोक पाच वर्षांच्या नंतर दिसत नाहीत, असंही धस म्हणाले.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh: तुमच्या पायखालची जमीन हादरून जाईल, संतोष देशमुखांचा पोस्टमार्ट्म रिपोर्ट आला समोर!
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला उशिरा केला, असं का वाटतं तुम्हाला? जे सत्तेत बसलेत त्यांना मागील दोन महिन्याचं महाराष्ट्रातील वातावरण कळत नव्हतं, त्यांनीही राजीनामा घ्यायला वेळ लावला, असं तुम्हाला वाटतं का? यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, "मी आमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अजिबात बोलणार नाही. 9 तारखेला घटना घडली. त्यानंतर (12 डिसेंबरल 2024)ती घटना उचलली. गुन्हा दाखल झाला. आम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजच नाहीत. कारण सभागृहाच्या भाषणावर जेवढ्या मागण्या मी केल्या होत्या, तेवढ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्या".
हे ही वाचा >> 'मी तुझ्याकडे भीक मागतो...' निशांतने अपूर्वाला लिहलं पत्र अन् उचललं टोकाचं पाऊल, हादरवून टाकणारी घटना
तुम्ही त्यावेळी सांगायचा प्रयत्न नाही केला, की यांना (धनंजय मुंडे) मंत्रिमंडळात घेऊच नका, यावर धस म्हणाले, "घेऊच नका असं म्हणणारे आम्ही कोण...त्यांची पार्टी आहे. अजितदादांच्या पार्टीने निर्णय घ्यायला पाहिजे होता. आमच्या पक्षाचा काय संबंध...ज्यावेळी चार्जशीट दाखल झालं आणि त्या चार्जशीटमधले फोटो बाहेर आले. फोटो बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री विधानभवनातून बाहरे निघाले आणि सह्याद्री गेस्ट हाऊसवर पोहोचले. तिथे त्यांनी अजितदादा, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, धनंजय मुंडे यांना बोलवून घेतलं आणि स्पष्टपणे सांगितलं की उद्या सकाळी तुम्ही राजीनामा देऊन टाका. त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी अजितदादांकडे राजीनामा दिला. दहा वाजता मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवून दिला".
ADVERTISEMENT
