Jagdeep Dhankhar: सोशल मीडियावर उपराष्ट्रपतींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) एकमेकांना हात जोडून नमस्कार करताना दिसत आहेत. त्यावरूनच विरोधकांनी म्हणजेच काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला होता. उपराष्ट्रपती किती खाली झुकणार आहेत ? असा सवाल काँग्रेस (Congress) नेत्यांनी केला होता.
ADVERTISEMENT
अजून किती वाकणार?
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावर टीका करताना मणका नसलेली, अजून किती वाकणार आहात, आता हाच दिवस पाहायाच बाकी होता अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. पोस्ट केलेल्या व्हिडिओवरून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरून आता उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनीही आपले मौन सोडत विरोधकांना संस्कारावरून सुनावले आहे.
हे ही वाचा >> ‘पोषण आहारात अंडी देण्याऐवजी…’, भाजप अध्यात्मिक आघाडीची मोठी मागणी
ही माझं मूल्ये
जगदी धनकड यांनी त्या व्हिडिओनंतर विरोधी पक्षाने केलेल्या त्या टीकेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. वाकून नमस्कार करणे ही माझी सवय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नमस्कार करणं ही माझं मूल्यं आहे. असं सांगत नमस्कार करताना माझ्या समोर कोण आहे ते महत्वाचं नाही मात्र अशा प्रकारच्या टीका झाल्या की, माझ्या मनाला खूप वेदना होतात असंही त्यांनी म्हटले आहे.
व्हिडीओ व्हायरल
उपराष्ट्रपतींच्या त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर त्यांनीही विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. तुम्ही संस्कारांची थट्टा करू नये. कारण वाकून नमस्कार करणे हा येथील सांस्कृतिक वारसा आहे. तुम्ही म्हणता पदाची काही गरिमा आहे की नाही मात्र पदाची प्रतिष्ठा ही तेव्हाच राखली जाते जेव्हा कोणतीही व्यक्ती ही त्याच्या वृत्तीतून नम्रपणा दाखवते. तुम्ही केलेली टीका ही मला वेदना देणारी ठरली कारण मी ज्यांचा आदर करतो त्याच माणसांकडून ही टीका केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वाभिमान बाळगणार नाही
व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओबद्दल बोलताना राज्यसभेतील एका सदस्यांनीह त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावर ते म्हणाले की, हे मी तुमच्या बुद्धीवर सोडून देतो आहे. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, मी अगदी नम्र व्यक्ती आहे, आणि उगाच अभिमान-स्वाभिमान बाळगणे मला कधी जमले नाही.
कोणासमोर नतमस्तक व्हावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांनी नमस्कार करताना ज्या प्रकारे त्यांनी नमस्कार केला होता. त्यावरूनच त्यांना विरोधकांनी घेरले होते. त्यावर त्यांनी आधी हे ही स्पष्ट केले की,सध्या मी किती नतमस्तक व्हावे, कुणासमोर नतमस्तक व्हावे, फोटोग्राफर कोणत्या अँगलमधून फोटो काढतो आहे, इन्स्टाग्रामवर कोण टाकेल हेही पाहावे लागते. त्यांनी ही वक्तव्यं केल्यावर मात्र सभागृहात प्रचंड शांतता पसरली होती. त्यांनी ज्या प्रकारे विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले ते सर्व सदस्यांना अनपेक्षित होते.
ADVERTISEMENT