"शरद पवार साहेबांची राजकारणातील गुगली...", महादजी शिंदे पुरस्कार मिळाल्यानंतर DCM एकनाथ शिंदेंचं मोठं विधान!

DCM Eknath Shinde On Sharad Pawar: "हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं, तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत. शेवटी शिंदे सगळे आलेच. सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते.

DCM Eknath Shinde On Sharad Pawar

DCM Eknath Shinde On Sharad Pawar

मुंबई तक

11 Feb 2025 (अपडेटेड: 11 Feb 2025, 08:54 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महादजी शिंदे पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सन्मान

point

शरद पवारांच्या हस्ते एकना शिंदेंना महादजी शिंदे पुरस्कार प्रदान

point

महादजी शिंदे पुरस्कार मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

DCM Eknath Shinde On Sharad Pawar: "हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं, तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत. शेवटी शिंदे सगळे आलेच. सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते. त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे. कधी क्लीन बोल्ड व्हायचे कळत नव्हतं. पवार साहेबांचीदेखील राजकारणातील गुगली बऱ्याच जणांना कळत नाही. पण माझ्याबद्दल मी थोडं वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांची प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आजवर मला कधीही गुगली टाकली नाही आणि यापुढेही टाकणार नाहीत, असा विश्वास आहे", असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.  महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन एकनाथ शिंदे यांना गौरवण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. 

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे जनतेला संबोधीत करत पुढे म्हणाले, "माझ्यासाठी हा आगळावेगळा पुरस्कार आहे. सर्वप्रथम मी दिल्लीचं तख्त राखणाऱ्या महादजी शिंदे यांच्या स्मृतीला वंदन करतो. आज थोर सेनानी महानायक महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मला इथे प्रदान करण्यात आलाय. त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. खरंतर पुरस्कार, सन्मान हे विचारवंत, कलावंत, साहित्यिकांसाठी असतात. राजकारण्यांना फार कमी असतात. पण हा पुरस्कार स्वीकारताना मनात थोडासा संकोच होता. पण आपलं प्रेमही होतं. खरं म्हणजे महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे. त्यामुळे थोडं दडपण होतंच. त्यामुळे पुरस्कार देऊन इथे जो सन्मान झालाय, त्याबद्दल तर मी आपल्याला मनापासून धन्यवाद दिलेच.

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder: 'ते' CCTV फुटेज समोर येताच धनंजय देशमुख संतापले, म्हणाले पोलिसांना तर...

परंतु, या सन्मानापेक्षा यामुळे येणारी जबाबदारी देखील मोठी आहे. याची जाणीवदेखील मला आहे. जेव्हा एखाद्याच्या पाठीवर चांगलं काम केल्यावर शाबासकीची थाप पडते, तेव्हा आणखी त्या व्यक्तीची जबाबदारी वाढते. आणखी त्याला चांगलं काम करावं लागतं. मग समाजातही चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते. समाजालाच त्याचा फायदा होतो. शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा, हा देखील एक भाग्य योग आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने वेगवेगळे योग जुळून आलेत, असंही शिंदे म्हणाले.

हे ही वाचा >> Jitendra Awhad : "सुरेश धस यांना मराठा समजात फूट पाडायला आणि जरांगेंना कापायला पाठवलंय"

    follow whatsapp