chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरे सरकारचं पाप झाकण्यासाठीच…”, चंद्रशेखर बावनकुळेंनी सुनावलं

योगेश पांडे

06 Sep 2023 (अपडेटेड: 06 Sep 2023, 02:40 PM)

Chandrashekhar Bawankule : शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना तुम्हाला नैतिक अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

chandrashelhar bawanlule maratha reservation uddhav thackeray

chandrashelhar bawanlule maratha reservation uddhav thackeray

follow google news

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे सरकारने केलेले पाप झाकण्यासाठी उबाठा गटाला या पद्धतीचे निवेदन करावे लागत आहे. राज्यपालांकडे जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री (Former cm Udahav thackeray) असताना सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात मांडला गेला नाही. त्यासाठी योग्य वकील लावले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने अनेक तारखा देऊनही उद्धव ठाकरे सरकार जागं झालं नाही. तर त्यावेळी शरद पवार हे तेव्हा महाविकास आघाडीचे नेते होते. त्यांनीही उद्धव ठाकरे सरकारला या संदर्भात काही मार्गदर्शन केले नसल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.

हे वाचलं का?

फडणवीस यांनी माफी मागितली

त्या उलट देवेंद्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात आरक्षण टिकवले होते. तरीही देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली. त्यानंतर त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हातून चूक घडली असल्याचेही त्यांनी मान्य केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही असं स्पष्ट शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

ठाकरे सरकार दोषी

चंद्रशेखर बावनकुळे यानी मराठ्यांचे आरक्षण जाण्याचा खरा दोषी कोण? असेल तर ते उद्धव ठाकरे सरकार आहे. उलट उद्धव ठाकरे यांनीच मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्या वागण्यामुळेच फुटला आहे. मूळ शिवसैनिकांना मातोश्रीवर, विधान मंडळात, मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश नव्हता. त्याच बरोबर ते कधीही आमदारांचे काम करत नव्हते. त्यामुळे शिवसेना आमदारांना आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिल्यामुळे पराभूत होऊ असे वाटले. त्यामुळेच शिवसेनेचे आमदार त्यांना सोडून गेले आहेत. त्यांच्यावर टीका करताना जे गजानन कीर्तीकर बोलले ते खरच बोलले आहेत.

भाजपचा आरक्षणाला पाठिंबा

भाजपचा मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे. फडणवीस सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा काम केलं होते. अनेक प्रकारच्या सवलती दिल्या होत्या. त्यासाठी सरकारने आर्थिक तरतूदही केली होती. जसा आरक्षण फडणवीस सरकारने मराठ्यांना दिले होते, तसेच आरक्षण मराठा समाजाला पुन्हा देण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचेच सरकार करत असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.

भूलथापांना बळी पडू नये

ज्या नेत्यांनी अनेक वर्षे सत्ता सांभाळूनही मराठा समाजासाठी काहीही केले नाही, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. सर्व मराठा समाजाच्या संघटनांनी सरकार सोबत येऊन सरकारसोबत चर्चा करावी आणि यातून मार्ग काढावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. ज्या प्रकारचे वेगळे आरक्षण फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिले होते, तसेच वेगळे आरक्षण मराठा समाजाला दिले पाहिजे. तर दुसऱ्या समाजाचे आरक्षणातून आरक्षण दिला जाऊ नये. हे कोणत्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मागासलेपणाचा अहवाल

शरद पवारांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेच्या कार्यकाळात मराठा समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाबद्दल अहवाल तयार केला नाही. तरर आता चौकशी समिती गठित केली आहे. त्याच्यातून सत्य समोर येईल त्यामुळे लाठीमाराच्या मागे कोण, आंदोलनाच्या मागे कोण. हे सरकार विधान मंडळात सांगणारच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

समिती काम करणार

निजामशाहीच्या काळातील काही प्रमाणपत्रावर कुणबी समाजाचा उल्लेख आहे. त्यामुळे त्या काळातील दस्ताएवेजामध्ये काय उल्लेख आहे. हे शोधण्यासाठी ही समिती काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

    follow whatsapp