Cm Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray : देशात आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जंयतीनिमित्त नव्या संसद भवनाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडले आहे. या नव्या संसद भवनावरून आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जंयतीवरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे. नव्या संसद भवनाच्या (New Parliament Inaugration) उद्धाटनाच्या कार्यक्रमावर काही लोक आक्षेप घेतात,हे दुदैव असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जंयतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते. (eknath shinde criticize udhhav thackeray on new parliament inaugration narendra modi)
ADVERTISEMENT
घराणेशाहीत अडकलेल्या पक्षाना देशाचे कल्याण, संस्कृती, हिंदुत्ववाद आणि सावरकरांचे वावडं असल्याची टीका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली आहे. सावरकरांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलाय म्हणून अशाप्रकारचा प्रयत्न होतोय. तसेच काही लोकांनी अशा अभिमानास्पद सोहळ्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलाय.परंतू नव्या संसद भवनाचा उद्धाटन सोहळा संपूर्ण देश पाहत असून देशातली 140 करोड जनता मोदींच्या पाठीशी असल्याचा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
हे ही वाचा: Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्धाटन
जगभरातील इतर देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असताना, देशाची आर्थिक व्यवस्था 11 व्या स्थानावरून 5 व्या स्थानी आणण्याचे मोठं काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी जगभरात लोकप्रियतेचा शिखर गाठलाय. त्यामुळे अनेकांना पोटदुखी झाली आहे, त्यामुळे पोटदुखी झालेल्यांना जनता जमाल गोटा देऊन पोटदूखी दुर करेल, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन म्हणून साजरा होतोय. आणि नवीन संसद देशवासियांसाठी अर्पित होत आहेत, या दोन्ही गोष्टी अभिमानास्पद बाब आहेत. नवीन संसद भवनाने लोकशाही अधिक बळकट,अधिक वृद्धींगत होईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा: बच्चू कडू-राणा दाम्पत्यात संघर्ष पेटला, लोकसभेच्या जागेवरून दावे प्रतिदावे
दरम्यान उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यवीर गौरव दिन, राष्ट्रभक्तीचे तेजस्वी जाज्वल्य,थोर स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
ADVERTISEMENT