'गृहमंत्री भाजपचाच...' CM फडणवीसांनी शिंदेंचा 'तो' विषय एका मिनिटातच संपवला!

गृह खात्यासाठी आग्रही असलेल्या एकनाथ शिंदेंना हे खातं मिळणार नसल्याचं आता जवळजवळ स्पष्ट झालं आहे. 'आज तक'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नेमकं भाष्य केलं आहे.

Mumbai Tak

साहिल जोशी

• 06:59 PM • 07 Dec 2024

follow google news

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आज तक'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत एकनाथ शिंदें यांच्या गृहमंत्रीपदाच्या मागणीचा विषय हा एका मिनिटात संपवून टाकला. मुख्यमंत्री पद मिळत नसलं तरी गृहमंत्री पद मिळावं यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही होते. त्यामुळेच त्यांनी शपथविधीच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत आपली मागणी लावून धरली होती. मात्र, आता फडणवीसांनी गृह खातं हे भाजपकडेच राहील असं स्पष्ट सांगितलं आहे. (home minister belongs to bjp cm devendra fadnavis ended eknath shinde demand for home ministry in just one minute in aaj tak exclusive interview)

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस यांनी 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना गृह खात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी गृह खातं हे भाजपकडे का राहावं यावर नेमकं भाष्य केलं आहे.

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेत 'त्या' महिलांना मिळणार नाहीत 2100? CM फडणवीसांनी केली घोषणा

'गृह खातं भाजपकडेच हवं...', पाहा फडणवीस नेमकं काय म्हणाले!

'आतापर्यंत त्यांनी कोणतंही मंत्रालय मागितलेलं नाही. पण त्यांनी हे म्हटलं की, जी तीन-चार महत्त्वाची खाती आहेत त्यावर आपण चर्चा केली पाहिजे. त्याच निर्णय आम्ही करू. '

'मुळात.. आम्हाला असं वाटतं की, गृह मंत्रालय हे आमच्याकडे राहायला हवं. आमच्याकडे नेहमीच हे खातं राहिलं आहे. विशेषत: काय होतं की, तसं तर आम्ही तिघं सोबतच आहोत. पण केंद्र सरकार, केंद्रीय गृह मंत्रालय यांच्याशी सततत संपर्क ठेवावा लागतो. नक्षलवादाची समस्या आहे, मुंबई सारखं शहर आहे.. आर्थिक राजधानी आहे.'

हे ही वाचा>> Aaditya Thackeray meets Devendra Fadnavis : आदित्य ठाकरेंनी फडणवीसांशी हात मिळवला, पण गुलाबरावांना इग्नोर...

'शिंदेजी, अजितदादा हे देखील हे सांभाळू शकतात. पण मी पक्षाचा व्यक्ती असल्याने माझा केंद्रीय नेतृत्वाशी जास्त संबंध येतो, संपर्क असतो. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो की, गृह मंत्रालय हे भाजपकडे असायला हवं.' असं म्हणत फडणवीसांनी गृह खात्याचा विषयच संपवून टाकला. 

शिंदेंना गृह खात्याविना उपमुख्यमंत्री पद? 

मुख्यमंत्री पद मिळत नसलं तर गृहखात्यासह उपमुख्यमंत्री पद मिळावं अशी एकनाथ शिंदे यांची मागणी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण हे खातं देण्यास भाजप तयार नसल्याने आता नेमक्या कोणत्या खात्यावर शिंदेंना समाधान मानावं लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 


 

    follow whatsapp