India Alliance Meeting : पवारांच्या घरात INDIA ची खलबतं, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

प्रशांत गोमाणे

13 Sep 2023 (अपडेटेड: 13 Sep 2023, 03:03 PM)

इंडिया (India Alliance) आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक दिल्लीत (Delhi) पार पडली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत 12 पक्षाचे नेते सामील झाले होते. या बैठकीत जागावाटप आणि इतर अनेक मुद्यावर चर्चा झाली आहे.

sharad pawar delhi house india alliance cordination meeting first rally bhopa madhya pradesh

sharad pawar delhi house india alliance cordination meeting first rally bhopa madhya pradesh

follow google news

India Alliance Meeting In Delhi : इंडिया (India Alliance) आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक दिल्लीत (Delhi) पार पडली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत 12 पक्षाचे नेते सामील झाले होते. या बैठकीत जागावाटप आणि इतर अनेक मुद्यावर चर्चा झाली आहे. यासोबतच इंडिया आघाडीच्या पहिल्या जाहिर सभेची देखील घोषणा करण्यात आली आहे. आता ही सभा कधी होणार आहे? आणि कोणत्या राज्यात होणार आहे? जाणून घेऊयात. (india alliance meeting in delhi sharad pawar house india alliance cordination meeting first rally bhopal madhya pradesh )

हे वाचलं का?

दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीला केसी वेणुगोपाल (काँग्रेस), टीआर बालू (डीएमके), तेजस्वी यादव (आरजेडी), संजय राऊत (शिवसेना युबीटी), संजय झा (जेडीयू), हेमंत सोरेन (जेएमएम),राघव चढ्ढा (आप), डी राजा (सीपीआय), उमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फ्रेन्स), मेहबूबा मुफ्ती (पीडीपी) आणि जावेद अली (सपा) आदी नेते उपस्थित होते.

हे ही वाचा : Maratha Reservation : ‘…तरचं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार’, विनोद पाटलांनी काढला तोडगा

या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. यासोबतच इंडिया आघाडी देशाच्या विविध भागात जाहीर सभा घेणार आहे. या सभांना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सूरूवात होणार आहे. या सभेची अधिकृत तारीख अद्याप निश्चित झाली नाही आहे. पण इंडिया आघाडीची ही पहिली सभा मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये पार पडणार आहे. हे बैठकीत निश्चित झाले आहे. तसेच इंडिया आघाडी या जाहीर सभेच्या माध्यमातून वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे ज्या न्यूज चॅनल्सचे अँकर्स पक्षपाती आहेत त्यांच्या चर्चेच्या कार्यक्रमाला ‘इंडिया’ आघाडीतील राजकीय पक्ष आपले प्रतिनिधी पाठवणार नाहीत, असा मोठा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या बैठकीत सहभागी पक्षांनी जात जनगणनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये हा मुद्दा जोरात मांडला जात आहे.

हे ही वाचा : Nashik Murder : सुखी संसाराची क्षणात झाली राखरांगोळी, आधी संपवलं पत्नीला नंतर…

मुंबईत समन्वय समिती स्थापन

विरोधी आघाडीच्या बैठकीत 13 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसकडून केसी वेणुगोपाल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, द्रमुककडून एमके स्टॅलिन, शिवसेनेकडून (युबीटी) संजय राऊत, आरजेडीकडून तेजस्वी यादव, टीएमसीकडून अभिषेक बॅनर्जी, आपकडून राघव चढ्ढा, सपाकडून जावेद खान, जेडीयूकडून लल्लन सिंह, हेमंत सिंह, झारखंड मुक्ती मोर्चाकडून सोरेन, डी राजा, एनसीचे ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, समन्वयक अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत.

दरम्यान याआधी मुंबईतल्या बैठकीत विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याचा ठराव मंजूर केला. जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष लवकरात लवकर देशाच्या विविध भागात जाहीर सभा घेतील, असा ठराव बैठकीत करण्यात आला. तसेच भारत आघाडीच्या नेत्यांनी ‘जुडेगा भारत, जीतेगा इंडिया’ या थीमसह विविध भाषांमधील आपापल्या प्रचार आणि मीडिया धोरण आणि अभियानांमध्ये समन्वय साधण्याचा संकल्प केला.

    follow whatsapp