Kirit Somaiya full video : भाजपचे नेते, मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार किरीट सोमय्यांच्या एका व्हिडीओने महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. भाजपविरोधकांनी किरीट सोमय्यांना घेरलं असून, मंगळवारी (18 जुलै) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्हिडीओ असलेला पेन ड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हेंकडे सुपूर्द केला. (Opposition leader Ambadas Danve submitted pen drive of Kirit Somaiya videos to assembly council chairperson to Neelam Gorhe)
ADVERTISEMENT
अंबादास दानवे यांनी पेन ड्राईव्ह दाखवल्यानंतर सभागृहातील काही सदस्यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ असं म्हटलं. त्यावेळी सभापती गोऱ्हेंनी नाही, पेन ड्राईव्ह माझ्याकडे द्या म्हणत सदस्यांना शांत बसण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अंबादास दानवे यांनी सोमय्यांचं नाव घेत भाजप, शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारलाही सवाल केले.
किरीट सोमय्यांच्या व्हिडीओचा पेन ड्राईव्ह दाखवत अंबादास दानवे काय बोलले?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “काही राजकीय पक्षातील मंडळी ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते बघून या फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना ते छेद देताहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकारणातील काही लोक ईडी, सीबीआयची भीती दाखवतात आणि त्याआडून लोकांना ब्लॅकमेल करतात. त्याचं एक्स्टॉर्शन करतात. हीच व्यक्ती त्यांच्या पक्षातील माता-भगिनींना पद देतो. महामंडळ देतो. माझे ईडीच्या अधिकाऱ्यांशी संबंध आहे. सीबीआयशी संबंध आहेत. असं सांगून एकप्रकारे महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत प्रश्न निर्माण करतात. जे राजकीय पक्ष नैतिकतेचे धडे देतात, या पक्षाचा मोठा पदाधिकारी राहिलेला मोठा माणूस… ज्या पद्धतीने या गोष्टी समोर आल्यात त्या धक्कादायक आहेत.”
वाचा >> Kirit Somaiya: आक्षेपार्ह Video वर सोमय्यांची 12 तासानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
याच मुद्द्यावर भूमिका मांडतांना त्यांनी सभागृहाला सांगितलं की, “अनेक महिलांना राज्यसभा, विधानसभा, महामंडळात नियुक्ती करण्याचं सांगून काही अधिकाऱ्यांचं एक्स्टॉर्शन करण्यात आल्याच्या घटना माझ्यापर्यंत काही माता-भगिनींनी मांडल्या आहेत. गुन्हा करणारी व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाची हा विषय महत्त्वाचा नाहीये. अपप्रवृत्ती आहे. माझ्याकडे काही व्हिडीओज आले आहेत. त्या भगिनीने हे व्हिडीओ अतिशय हिंमत करून माझ्यापर्यंत पोहोचवले आहेत. तिला मी सलाम करेन”, असं ते म्हणाले.
वाचा >> समर्थक आमदारच अजित पवारांवर भडकले; भेटीआधी काय घडलं? Inside Story
आठ तासांचे व्हिडीओ…
“या व्यक्तीला सीआयएसएफची सुरक्षा आहे. केंद्राची सुरक्षा आहे. याचा वापर महिलांचं शोषण करण्यासाठी केला जातो की काय, अशी स्थिती आहे. काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला गेला आहे. खडसे साहेब, आठ तासाचे व्हिडीओ आहेत. मी सभापतींना ते देणार आहे. अशी व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे. विशेषतः मराठी भगिनींचं शोषण केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. सरकार महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलतं. नैतिकतेबद्दल बोलतं. राजकीय दलाल, उपरे या महाराष्ट्रात आलेले आहेत आणि मराठी माता-भगिनींचा छळ करण्याचा प्रयत्न करताहेत. असे जे आहेत त्यांचं नाव मी घेतो. किरीट सोमय्या त्यांचं नाव आहे”, असा हल्लाबोल दानवे यांनी सभागृहात केला.
वाचा >> वासनांध प्रदीप कुरुळकरचे कारनामे! कार्यालयातील बाथरूममध्येच महिलांसोबत…
“किरीट सोमय्यांनी कशा पद्धतीने कोणत्या गोष्टी केल्या आहेत. अशा किरीट सोमय्याला सत्ताधारी पक्ष संरक्षण देणार का? माता-भगिनींनी टाहो फोडलेला आहे. याच्याविषयी राज्य सरकार काय करणार आहे? अशा किरीट सोमय्यांमुळे अनेक लोकांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केलेला आहे. काहींना तुरुंगात जावं लागलं. ते आरोप खरे होते, खोटे होते कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोही आहे”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
अंबादास दानवेंनी काय केली मागणी?
“किरीट सोमय्याचा माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे. सभापती महोदय, अत्यंत किळसवाणं आहे. हे पेन ड्राईव्ह मी आपल्याला देतो. बघावं असं नाहीये. पण, संरक्षण दिलेल्यांवर सरकार कारवाई करणार का? यांचं संरक्षण काढणार का? हे पेन ड्राईव्ह बघा आणि राज्य सरकारला निर्देश द्या. जर संवाद ऐकले, तर ज्या पद्धतीने मराठी माणसाविषयी, मराठी स्त्रियांविषयी ज्या पद्धतीने बोलले आहेत. याचा तपास करावा. गृह मंत्रालयाला पेन ड्राईव्हचे अवलोकन करून योग्य ती कारवाई करण्यास भाग पाडावे”, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
ADVERTISEMENT