Kishanchand Tanwani latest News: छ. संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीनं उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर नेतेमंडळी जोरदार शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल करत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजी नगर मध्यचे उमेदवार किशनचंद तनवानी यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तनवानी यांनी माध्यमांशी बोलताना उमेदवारी मागे घेण्याचं कारण सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
किशनचंद तनवानी काय म्हणाले?
पक्षप्रमुखांनी (उद्धव ठाकरे) मला उमेदवारी दिली होती. ती उमेदवारी मी मागे घेतली आहे. 2014 ची परिस्थिती होऊ नये, यासाठी मी लढणार नाही, अशी विनंती उद्धव ठाकरे यांना केली. 2014 ला हीच परिस्थिती झाली होती. 2019 ला हीच परिस्थिती होणार होती. प्रदीप जैस्वालची तब्येत ठीक नसतानाही मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे.
हे ही वाचा >> Ajit Pawar: "लोकसभेला ताई आणि विधानसभेला...", बारामतीत अजित पवार झाले भावुक, नेमकं काय म्हणाले?
भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याध्यक्ष असताना मी लढलो नाही. त्याला पाठिंबा देऊन निवडून आणलं आहे. 2024 ला तो माझ्यासोबत राहील असं उद्धव साहेबांसमोर ठरलं होतं. आता त्यांनी पक्ष बदलला आणि एकनाथ शिंदे गटात त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. 2014 ची परिस्थिती होऊ नये, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने संभाजीनगर मध्य या मतदारसंघासाठी पहिल्या यादीत त्यांचं नाव घोषित केलं होतं. परंतु, तनवानी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा >> BJP 3rd Candidate List : राम सातपुते, सुरेश धस यांना संधी; भाजपच्या शेवटच्या यादीत कुणाकुणाचा नंबर लागला?
ADVERTISEMENT