Who is Sunetra Pawar: मुंबई: महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणूक अत्यंत रंजक लढती होणार आहेत. अशातच पवार घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या बारामती (Baramati) मतदारसंघाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिथे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना त्यांच्याच वहिनी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याशी स्पर्धा करावी लागण्याची शक्यता आहे. खुद्द अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चांना खतपाणी घातले आहे. (lok sabha election 2024 who is sunetra pawar who is going to give competition to sharad pawar daughter supriya sule in the family stronghold baramati)
ADVERTISEMENT
बारामतीत शुक्रवारी अजित पवार यांनी कोणाचेही नाव न घेता आपल्या मतदारांना भावनिक आवाहन केले की, 'पुढील सार्वत्रिक निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पण अनुभवी लोकांसोबत राहणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या.' अजित पवार यांनी आपल्या भाषणात पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता आगामी निवडणुकीत पत्नी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत मात्र दिले आहेत.
कोण आहेत सुनेत्रा पवार?
60 वर्षीय सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्या राज्यातील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे माजी मंत्री होते, तर त्यांचे भाचे राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील हे उस्मानाबादचे भाजपचे आमदार आहेत. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दोन मुलं आहेत. जय आणि पार्थ पवार. जय हा कौटुंबिक व्यवसाय चालवतो, तर पार्थ पवार हे राजकारणात आहे. पार्थ पवार यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून लढवली होती. पण त्यात त्यांना यश आले नव्हते.
सुनेत्रा पवार या आजवर सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या पण समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत. 2010 मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या संस्थापक आहेत. भारतातील इको-व्हिलेजची संकल्पना विकसित करण्यात त्या मार्गदर्शक ठरल्या आहेत, असे अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे.
हे ही वाचा>> '..तर मी विधानसभा लढवणार नाही', अजितदादांचा नवा डाव
वेबसाइटनुसार, सुनेत्रा पवार या स्वदेशी आणि प्रसिद्ध शैक्षणिक संस्था विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त देखील आहे. वेबसाइटनुसार, सुनेत्रा पवार 2011 पासून फ्रान्सच्या वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरमच्या थिंक टँक सदस्यही आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजित पवार हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सामाजिक कार्याचा सक्रियपणे प्रचार करत असल्याचे जाहीर सभांमधून सांगत आहेत. सुनेत्रा पवार यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा तपशील दाखवून देण्यासाठी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रथही काढण्यात आला आहे.
हा रथ संपूर्ण लोकसभा मतदारसंघात फिरणार आहे. सध्या सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत. त्यांच्या आधी त्यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) संस्थापक शरद पवार हे 1996 ते 2004 पर्यंत सातत्याने खासदार राहिले आहेत. सुप्रिया सुळे 2009 पासून इथल्या खासदार आहेत.
बारामती मतदारसंघ आणि पवार परिवार
बारामती मतदारसंघ हा परंपरागतपणे पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिला आहे. शरद पवार यांनी 1967, 1972, 1978, 1980, 1985 आणि 1990 मध्ये बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकली आणि 1984, 1996, 1998, 1999 आणि 2004 मध्ये बारामतीतून लोकसभा निवडणूकही जिंकली. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे माढा येथून विजयी झाले होते. त्यावेळी म्हणजे 2009 साली सुप्रिया सुळे या बारामतीतून निवडून लोकसभेवर गेले होते. त्यानंतर पुढील दोन्ही निवडणुकीत म्हणजे 2014 आणि 2019 साली त्या लोकसभेत निवडून गेल्या.
हे ही वाचा>> 'तेव्हा सांगतो कसा आहे अजित पवार', दादांची कोणाला धमकी?
तर अजित पवार यांनी 1991 मध्ये बारामती लोकसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर त्यांनी 1991, 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 अशी सात वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली.
ADVERTISEMENT