Lok Sabha elections 2024: भारतीय जनता पार्टीकडून (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. या यादीमध्ये दिल्लीतून 5 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत, मात्र त्यापैकी 4 विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी (MP Ramesh Bidhuri) यांचाही पत्ता कट केलेल्या खासदारांमध्ये त्यांचे नाव आहे.
ADVERTISEMENT
नव्या लोकांसाठी पायघड्या
लोकसभेच्या यादीतून आपला पत्ता कट झाल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होतं. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याविषयी बोलताना आणि नव्या उमेदवारांवर निशाणा साधताना माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की,'अनेकदा बाहेरून आलेल्या उमेदवारांसाठी येथे पायघड्या टाकल्या जातात, मात्र पक्षातील जुनी लोकं जुन्याच सतरंजीवर झोपत असतात' असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
आम्ही कार्यकर्ते
रमेश बिधुरी यांनी त्यांना तिकीट नाकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'पक्षाच्या हायकमांडला काय वाटले असेल, ते त्यांनाच माहिती आहे. हा पक्ष मोठा आहे. या पक्षात घराणेशाही नाही. तसेच आम्ही विचारांसाठी लढणारी लोकं आहोत, आणि महत्वाचं म्हणजे पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत.
हे ही वाचा >> 'संविधान वाचवण्यासाठीच आंबेडकरांनी साथ द्यावी', राऊतांची पुन्हा आंबेडकरांना हाक
मात्र जर पक्षात बाहेरून लोकं आली तर मात्र त्यांच्यासाठी पायघड्या टाकल्या जातात आणि जुनी लोकांना मात्र ना पायघड्या टाकल्या जातात, ना त्यांना नवं काही देतात. जुन्यात त्याच गोष्टीवर त्यांना थांबावे लागते. त्यामुळे पक्षातील जुन्या लोकांना मोठं मन करून थांबावं लागतं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पक्षाचा विचार चालवायचे
बिधुरी यांनी सांगितले की, 'कधीकधी येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वच्छ आणि मखमली पायघड्या घालव्या लागतात, कारण पक्षामध्ये येणारे ते पाहुणे असतात. तर आमच्यासारखी माणसं ही घरातील माणसांसारखीच असतात कारण तिच पक्षाची असतात.
त्यांनाच त्या पाहुण्यांचा मान राखायचा असतो. पक्षाचा विचार पुढं घेऊन जायचे असतात. पक्षाचा मान सन्मान वाढवायचा असतो, आणि त्यासाठीच काम करायचं असतं आणि आम्ही त्यासाठीच काम करणारी माणसं आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
गंभीरची निवृत्ती
भाजपकडून दिल्लीतील 5 उमेदवारांची नावं जाहीर केली असली तरी अद्याप पूर्व दिल्ली आणि उत्तर आणि पश्चिममधील उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. 5 पैकी 4 खासदारांचे तिकीट नाकारण्यात आल्यानंतर या दोन जागांबाबत आता आणखी चर्चा सुरु झाली आहे.
तिकीट जाहीर होण्यापूर्वीच पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी पत्र लिहून त्यांनी राजकारणातून आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे, तर पश्चिम दिल्लीच्या जागेबाबत म्हणजेच हंसराज हंस यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
आप-काँग्रेसचं आव्हान
मागील निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र आता खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा विचार करून दिल्लीतील 4 खासदारांची तिकीटं रद्द करण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे समजते आहे.
यावेळी दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी युती करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून आम आदमी पक्षाने 4 जागांवर आपल्या उमेदवारांची नावंही जाहीर केली आहेत, त्यामुळे भाजपसमोरील आव्हानही तेवढेच वाढले आहे. आप आणि काँग्रेसच्या आव्हानांमुळेच आणि विजय खेचून आणण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT