Madhya Pradesh Exit Poll 2023: मध्य प्रदेश निवडणुकीचा Poll of Polls, कोण मिळवणार सत्ता?

रोहित गोळे

• 04:03 PM • 30 Nov 2023

Madhya Pradesh Assembly Election Poll Of Polls: मध्य प्रदेश हे भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हे राज्य टिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता एक्झिट पोलचे आकडे हे समोर आले आहेत. ज्यापैकी मध्य प्रदेशचा पोल ऑफ पोल्स काय आहे ते पाहा.

madhya pradesh exit poll 2023 poll of polls of madhya pradesh election who will win

madhya pradesh exit poll 2023 poll of polls of madhya pradesh election who will win

follow google news

Madhya Pradesh Election Poll Of Polls Exit Poll 2023: पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकींपैकी मध्य प्रदेश हे भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचं राज्य आहे. या राज्यात सत्ता गमावल्यास त्याचा फटका हा लोकसभा निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळेच भाजपने येथे जोरदार तयारी केली. अनेक एक्झिट पोलनुसार भाजप येथे आपली सत्ता राखण्यात यशस्वी झाली आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेनुसार, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला घवघवीत बहुमत मिळू शकतं आणि ते सहजपणे सत्ता स्थापन करू शकतात.

हे वाचलं का?

इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल

इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार भाजपला 80 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 86 ते 106 जागा मिळतील. याशिवाय इतरांना 9 ते 18 जागा मिळतील

पाहा काय आहे मध्य प्रदेशचा Poll of Polls

इतर चॅनल आणि सर्वेक्षण संस्थांचा नेमका एक्झिट पोल काय?

  • News 18- जन की बातच्या सर्वेनुसार भाजपला मध्य प्रदेशमध्ये 100-123 जागा मिळतील. तर काँग्रेसला 102 ते 125 जागा आणि इतरांना 5 जागा मिळतील.

  • टाइम्स नाऊ ईटीजीच्या सर्वेनुसार भाजपला मध्य प्रदेशमध्ये 105-117 जागा मिळतील. तर काँग्रेसला 109 ते 125 जागा आणि इतरांना 1 ते 5 जागा मिळतील.
पाहा मध्य प्रदेशचा Poll of Polls

 

  • ABP- सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला मध्य प्रदेशमध्ये 88-112 जागा मिळतील. तर काँग्रेसला 113-137 जागा आणि इतरांना 2-8 जागा मिळतील.

    follow whatsapp