Ram Mandir : सध्या अयोध्या (Ayodhya) नगरी राम मंदिरासाठी सज्ज आहे, त्यासाठी सर्व पातळीवर जय्यत तयारी केली जात आहे. त्यावरूनच आता देशातील राजकारण तापले आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरांचे उद्घाटन होत आहे. त्यावरूनच आता हनुमानगडाचे महंत राजूदास महाराज (Mahant Rajudas Maharaj) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्या प्रकाराचं राजकारण चालवलं आहे, ते राजकारण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देण्याचेच काम उद्धव ठाकरेंने केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या याच राजकारणामुळे आजही बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) आत्मा रडत असेल असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
ADVERTISEMENT
मुंबईकरांचा वाटा मोठा
महंत राजूदास महाराज यांनी बोलताना उद्धव ठाकरेंचा दाखल देत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचा हे मंदिर उभा करण्यामध्ये मोठा वाटा आहे. कारण मुंबईकरांनी अयोध्येत येऊन मंदिर उभा करण्यासाठी मोठा वाटा उचलला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी जाहिररित्या सांगितले होते की, बाबरीचा ढाचा माझ्या लोकांनी पाडला त्याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी जाहिररित्या सांगितले होते, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा नेता होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा >> Ram Mandir : “उद्धव ठाकरेही अयोध्येला जाणार, पण…”, राऊतांनी सांगितला प्लॅन
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली
राजूदास महाराज यांनी म्हणाले की, माझ्यावरही टीका होते, हिंदू धर्म आणि सनातन धर्माविषयी बोलले की, माझ्यावर टीका केली जाते. मात्र उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम केले आहे. ते बघून बाळासाहेब ठाकरेंचाही आत्महा रडत असेल अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरेंनी राजकारण करत असताना जे रामद्रोही होते, त्यांच्याबरोबरच त्यांनी सत्ता मिळवली. सत्तेसाठी आणि राजकारणासाठी त्यांनी सोनिया गांधींचेही पाय धरले अन् हेच खरं दुर्भाग्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बाळासाहेबांचे पुत्र असल्यामुळेच वेदना
उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका करताना त्यांनी भाजपाचा हा इव्हेंट असल्याचे म्हटले मात्र त्या उद्धव ठाकरेंचे आता अवस्था काय आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपवर टीका करत असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाचाही विचार करायला हवा. कारण उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र असल्यामुळेच त्याच्या आम्हाला वेदना होत आहेत. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी गर्वसे कहो हम हिंदू है असा नारा दिला होता, त्याच्या विरोधात जात उद्धव ठाकरे रामद्रोहींसोबत सत्तेत जाऊन बसले अशी जोरदार टीकाही त्यांनी केली आहे.
सगळी जबाबदारी ट्रस्टची
यावेळी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी जो राम का नहीं वो किसी काम का नहीं असा टोलाही त्यांना लगावला आहे. त्यामुळे निमंत्रणावरून चाललेल्या वादावर बोलताना ते म्हणाले की, निमंत्रणाचा प्रश्न आणि निर्णय घेण्याची सगळी जबाबदारी ही ट्रस्ट घेईल पण ज्यांनी रामद्रोह केला त्यांनी राम मंदिरावर बोलूही नये असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
ADVERTISEMENT