BJP: माधव भांडारींच्या मुलाने भाजपला सुनावलं, 'मी आयुष्यभर...'

मुंबई तक

15 Feb 2024 (अपडेटेड: 15 Feb 2024, 11:25 PM)

राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठ्या उलथापालथी होत असतानाच माधव भंडारी यांच्या मुलाची पोस्ट मात्र प्रचंड चर्चेत आली आहे. कारण चिन्मय भंडारी यांनी आपल्या वडिलांचा राजकीय प्रवास सांगत असताना अनेकदा त्यांच्या नावाची विधानसभेसाठी वगैरे चर्चा झाली मात्र त्यांचं नाव कधी अंतिम झालं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

madhav bhandari chinmay bhandari

madhav bhandari chinmay bhandari

follow google news

बातम्या हायलाइट

point

माधव भंडारींनी पदासाठी कधी ओरड केली नाही

point

माझ्या वडिलांच्या राजकीय आयुष्याचा मी मूक साक्षीदार

point

चिन्मय भंडारी यांची पोस्ट चर्चेत

Madhav Bhandari: राज्याच्या राजकारणात अनेक मोठ मोठ्या घटना घडत आहेत. त्यातच राज्यसभेच्या काँग्रेस (Congress), भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेना, अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आले. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आज महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे सुपुत्र चिन्मय भांडारी (Chinmay Bhandari) यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. यावेळी अगदी स्पष्ट शब्दात चिन्मय भांडारी यांनी आपल्या पोस्टमधून भाजपला सुनावलं आहे. आपले वडील माधव भांडारी यांचा राजकीय प्रवास सांगत त्यांनी जनसंघपासून ते अगदी 2014 पर्यंत त्यांनी भाजपसाठी केलेल्या कार्याच्या यादीच त्यांनी सांगितली आहे. 

हे वाचलं का?

सत्ताधाऱ्यांना घाम फोडला 

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विरोधकांवर तुटून पडणाऱ्या माधव भांडारी यांच्याविषयी लिहिताना चिन्मय भांडारी यांनी यूपीए सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांविरोधात त्यांनी जोरदार आवाज उठवला. त्यांच्यासोबत आणखीही काही नेते होते. मात्र या काळात माधव भांडारी यांनी पक्षासाठी जीव तोडून काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.  

संघटना बळकट केली

जनसंघापासून काम करणाऱ्या माधव भांडारी यांनी राज्यातील अनेक भागात जात संघटना बळकट केली, त्याची उभारणीही त्यांनी केली. हे काम करत असताना त्यांनी हजारो लोकांसाठी काम केले म्हणूनच त्यांचा अनेक लोकांवर प्रभावही पडला असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमधून लिहिले आहे.

माधव भांडारीचा विचारधारेवर विश्वास

माधव भांडारी यांनी पक्षासाठी काम केले असले तरी त्यांनी त्यांच्या पदाचा आणि पक्षाचा कधीही दुरुपयोगही केला नाही. 2014 नंतरही त्यांनी पक्षासाठी अविरत मेहनत घेतली. पक्षाच्या कामाबरोबरच त्यांनी लेखन करण्याचेही थांबवले नाही, आणि पक्षाकडून कोणतीही अपेक्षाही ठेवली नाही कारण त्यांचा विचारधारेवर विश्वास आहे असंही त्यांनी व्यक्त केले आहे. चिन्मय भांडारी यांनी त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचे पद असतानाही त्यांचे कुटुंबीय 90 च्या दशकात त्यांनी घरात वीज नसताना दिवस काढले ही खंतही त्यांनी सांगितली आहे. 

नाव कधीही पुढं आलं नाही

माधव भांडारी यांचं नाव कधी विधानसभेसाठी किंवा कधी वरिष्ठ सभागृहासाठी चर्चेत राहिले मात्र शेवटपर्यंत त्यांचे नाव कधी अंतिम झाले नाही. यावर त्यांची आणि माझी कोणतीही तक्रार नाही कारण माझ्या वडिलांप्रमाणे विचारधारेवर विश्वास असल्याचं भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. 

व्यथा मांडली नाही

राज्यसभा आणि अनेक राजकीय घटना वेगाने घडत असतानाही भाजपचा आवाज बुलंद करणाऱ्या माधव भांडारी यांचं नाव मात्र कुठंच येत नाही. यावरही चिन्मय भांडारी यांनी बोलत माधव भंडारी यांनी कधीही जाहीरपणे आपली व्यथा मांडली नाही. ज्या पक्षाच्या उभारणीसाठी त्यांनी सगळं आयुष्य खर्ची घातले त्यांनी पक्षाला कधीही दुखावण्याचाही प्रयत्न केला नाही.

 अन्याय झाला म्हणून...

जे नेते खासदार, आमदार  आणि मंत्री झाले तरीही ते आपल्यावर अन्याय झाला म्हणून ओरडताना आपण पाहिल मात्र माधव भांडारी यांनी आपली व्यथा कधीही आणि कोणापुढंही मांडली नाही अशी खंतही चिन्मय भांडारी यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केली आहे.

    follow whatsapp