MLA Disqualification : राऊतांचा नार्वेकरांवर हल्ला, म्हणाले, ‘भाजप नेता म्हणून निकाल देणार…’

प्रशांत गोमाणे

• 05:54 AM • 09 Jan 2024

आम्ही म्हणतोय न्यायाधीश निकाल देतील, पण तुम्ही म्हणताय राहुल नार्वेकर देतील. पण जर व्यक्तीश: राहुल नार्वेकर निकाल देणार असतील तर भाजपचे नेते, तर निकाल आताच लागला आहे असे समजा, असे संजय राऊत म्हणाले.

mla disqualification case sanjay raut reaction vidhansabha speaker rahul narvekar eknath shinde maharashtra politics

mla disqualification case sanjay raut reaction vidhansabha speaker rahul narvekar eknath shinde maharashtra politics

follow google news

Sanjay Raut Reaction On MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेचा निकाल उद्या येणार आहे. उद्या 10 जानेवारीला दुपारी 4 वाजता या निकालाचे वाचन होणार आहे. त्यामुळे हा निकाल ठाकरे गट किंवा शिंदे गट नेमका कुणाच्या बाजून लागतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या निकालाआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जर व्यक्तीश: राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) निकाल देणार असतील तर निकाल आताच लागला आहे, आणि जर ते न्यायाधीश म्हणून निकाल देणार असतील तर ते देशाच्या सविधानाला आणि घटनेनुसार धरून निकाल देतील, असा हल्ला राऊतांनी नार्वेकरांवर चढवला आहे. (mla disqualification case sanjay raut reaction vidhansabha speaker rahul narvekar eknath shinde maharashtra politics)

हे वाचलं का?

संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणासह इतर अनेक मुद्यावर भाष्य केले. आम्ही म्हणतोय न्यायाधीश निकाल देतील, पण तुम्ही म्हणताय राहुल नार्वेकर देतील. पण जर व्यक्तीश: राहुल नार्वेकर निकाल देणार असतील तर भाजपचे नेते, तर निकाल आताच लागला आहे असे समजा, असे संजय राऊत म्हणाले.जर ते न्यायाधीश म्हणून निकाल देणार असतील तर ते देशाच्या सविधानाला आणि घटनेनुसार धरून निकाल देतील. पण न्यायाधीश पदावरील व्यक्ती निकालाआधी आरोपींना भेटून बंद दाराआड चर्चा करत असतील, तर लोकांच्या मनात शंका आहे. आता या शंकाचे निरसन कसे होईल हे आपल्याला उद्या कळेलच असे देखील राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Sharad Mohol : ‘… तर शरद मोहोळची हत्या झाली नसती, ‘त्या’ दोघांबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती

जागावाटपावर काय म्हणाले?

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील तीनही पक्षाच्या जागा वाटपाच्या बैठका झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतीच अडचण नाही आहेत. काँग्रेसबाबत देखील हीच स्थिती आहे. शिवसेनेने देखील 48 जागांची चाचणी केली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

    follow whatsapp