Nitesh Rane : खिचडी घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या भावाला ईडीने समन्स बजावल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. संजय राऊतांच्या (Sanjay Raut) भावाला ईडीने (ED) समन्स बजावल्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊतांवर टीका करताना त्यांनी आमच्या नेत्यांना अफजलखानची उपमा देणारे मुगलांचे वंशज फिरत आहेत त्यांना आता ठेचण्याचे काम शिवशाही सरकार करणार असल्याचा थेट इशाराच नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी दिला आहे. त्यामुळे खिचडी घोटाळ्यावरून हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(MLA Nitesh Rane criticizes MP Sanjay Raut after ED summons)
ADVERTISEMENT
आमदार नितेश राणे यांनी राऊत बंधूंवर टीका करताना त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख केला आहे. खिचडी घोटाळाप्रकरणी राजाराम राऊतच्या मुलाला ईडीचा समन्स आला असल्याची खोचक टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation : जरांगेंचा सरकारला इशारा’, ‘…तिथपर्यंत आंदोलन संपणार नाही’
लाज वाटत नाही
आपल्या भावाला ईडीकडून समन्स आल्यानंतर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावरूनच नितेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी ईडीवरून टीका करताना म्हणाले होते, की, दोन पाच लाखासाठी नोटीसी पाठवता तुम्ही का चिंचोके खाता असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर बोलताना राणे 2-5 लाखांच्या घोटाळ्यासाठी समन्स का असं बोलायला या नालायक माणसाला लाज का वाटत नाही अशा जहरी शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला होता.
आता दुसऱ्या भावाचा नंबर
खिचडी वाटण्यासाठी महाराष्ट्रात राजाराम राऊतच्या कुटुंबाऐवजी दुसरं कोणीच नव्हतं का असं म्हणत आता राजाराम राऊतचा मुलगा ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार असं सांगून त्यांना पुन्हा डिवचण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. त्यामुळे खिचडी प्रकरणावरून राणे-राऊत वाद रंगण्याची शक्यता आहे.
इंडिया आघाडीला श्रद्धांजली
आमदार नितेश राणे यांनी यावेळी ईडीवरून राऊत बंधूंवर टीका करताना त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी इंडिया आलायन्सला कायम स्वरूपी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणत त्यांच्यामध्ये आघाडी राहिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी व केजरीवाल यांनीही पाठिंबी काढल्याने आता त्यांच्यामध्ये काहीच शिल्लक राहिले नसल्याचा टोला त्यांनी इंडिया आघाडीला लगावला आहे.
ADVERTISEMENT