Mood Of the Nation Opinion Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इंडिया टुडे- सी व्होटरने केलेल्या मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोलचे आकडे समोर आले आहे. देशात पुन्हा नरेंद्र मोदींचे सरकार येताना दिसत आहे. असे असले तरी उत्तरेत प्रत्यक्ष निकालात भाजपच्या जागा घडल्या, तर भाजपचं टेन्शन वाढू शकतं. कारण, भाजपकडून ज्या राज्यांमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तिथे मोदींची गॅरंटी फेल ठरल्याचे या पोलमधून दिसत आहे. (Narendra Modi's popularity in the South Indian state still does not seem to be helping the BJP.)
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशसह उत्तरेतील राज्यांमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. इंडिया टुडे सी व्होटरच्या मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आलेले अंदाज भाजपला दिलासा देणार आहेत. पण, ज्या दक्षिण भारताकडे भाजपने लक्ष्य केंद्रीत केलं आहे, तिथे यावेळी अपयश येण्याची शक्यता आहे.
Lok Sabha 2024 Election : दक्षिण भाजप भाजपसाठी का महत्त्वाचा?
दक्षिण भारतातील पाच राज्यांमध्ये केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही राज्ये येतात. या पाच राज्यांमध्ये लोकसभेच्या 129 जागा आहेत. अलिकडेच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत हे दिसून आले की, भाजपची ताकद आहे, ती उत्तर भारतात. पण, उत्तर भारतावर विसंबून तिसऱ्यांदा सत्तेत येता येईल, या भरवशावर भाजप नाही, असेच दिसत आहे. नरेंद्र मोदींचे दाक्षिणात्य राज्यातील दौरे हेच सांगताहेत.
129 जागांपैकी 84 जागांवर भाजपची नजर आहे. कर्नाटकात 25, तेलंगणात 10, केरळात 5 लोकसभा मतदारसंघात भाजपने ताकद लावलेली आहे. भाजपने देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार अशी घोषणा केली आहे. इतकंच नाही तर 2014 मध्ये 400 पेक्षा जास्त जागा आणि 51 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवण्याचे लक्ष्य आहे.
गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये भाजप मजबूत आहे. या राज्यामध्ये भाजपची कामगिरी चांगली राहील असे अंदाज मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोलमध्ये व्यक्त केले आहेत. पण, या राज्यांमध्ये जागा वाढण्याऐवजी आहे त्या जागांमध्येच घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील 129 जागाशिवाय भाजपला 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य सोप्पं नाही.
Mood of the Nation 2014 : दक्षिणेत कोण ठरणार भारी?
आता मूड ऑफ द नेशनचा जो ओपिनियन पोल समोर आला आहे, त्यात भाजपची झोळी यावेळी रिकामीच राहील असा अंदाज आहे. तर इंडिया आघाडी मात्र, मोठी मुसंडी मारताना दिसत आहे.
तामिळनाडूत इंडिया आघाडीची हवा
सर्व्हेनुसार, तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीला 47 टक्के मते मिळू शकतात, तर एनडीएला 15 टक्के. इतरांच्या खात्यात 38 टक्के मते पडू शकतात. आता जागांच्याबद्दल सांगायचे, तर इंडिया आघाडी म्हणजे द्रमुक आणि काँग्रेस 39 जागा जिंकू शकते. द्रमुकला 31 तर काँग्रेसला 8 जागा मिळतील, तर भाजपला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज आहे.
कर्नाटकात भाजपला सर्वाधिक जागा, पण...
आता कर्नाटकाबद्दल सांगायचं तर भाजपला कर्नाटकात सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहे. पण, 2019 च्या लोकशभा निवडणुकीच्या तुलनेत फटका बसताना दिसत आहे. भाजप प्रणित एनडीएने 2019 मध्ये 28 पैकी 27 जागा जिंकल्या होत्या, पण आता निवडणूक झाल्यास 24 जागा जिंकेल, अशी स्थिती आहे.
आंध्र प्रदेशात टीडीपी ठरणार गेमचेंजर
आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. इथे एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही अपयशी ठरताना दिसत आहे. चंद्रबाबू नायडू यांची टीडीपी 17जागा जिंकू शकते, असा अंदाज आहे. तर जगनमोहन रेड्डी यांची वायआरएस काँग्रेस 8 जिंकू शकते.
केरळात इंडिया आघाडीचं वर्चस्व
20 जागा असलेल्या केरळात इंडिया आघाडीचा दबदबा दिसत आहे. सर्व जागा काँग्रेस आणि डावे जिंकणार असा अंदाज आहे. काँग्रेस 18, पिनराई विजयनची एलडीएफला 2 जागा मिळू शकतात.
तेलंगणात भाजपला फटका
सर्व्हेनुसार, तेलंगणातील 17 जागांपैकी 10 जागा इंडिया आघाडी जिंकू शकते. भाजपला एका जागेचा फटका बसू शकतो. 2019 च्या निवडणुकीत भाजपला 4 जागा मिळाल्या होत्या. यावेळी तीन जागा भाजप जिंकू शकते.
ADVERTISEMENT