राष्ट्रवादी 15 वर्ष सत्तेत असून दुसरी बारामती का तयार झाली नाही? अजित पवार म्हणाले…

मुंबई तक

• 02:44 PM • 21 Apr 2023

राष्ट्रवादी 15 वर्ष सत्तेत असताना देखील दुसरी बारामती का तयार झाली नाही? असा सवाल विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्यांनी संपूर्ण विकासाचा रोडमॅपच सांगितला.

Why wasn't another Baramati created? Ajit Pawar said...

Why wasn't another Baramati created? Ajit Pawar said...

follow google news

मुंबईत एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी कार्यकर्ता मेळाव्यात नेत्यांना मार्गदर्शन करून केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली असताना, दुसरीकडे सकाळ मीडियावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची मुलाखत पार पडली.या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. या मुलाखतीत राष्ट्रवादी 15 वर्ष सत्तेत असताना देखील दुसरी बारामती का तयार झाली नाही? असा सवाल विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्यांनी संपूर्ण विकासाचा रोडमॅपच सांगितला. (ncp has been in power for 15 years and why has another baramati not been prepared?what ajit pawar said…)

हे वाचलं का?

बारामती काय एका दिवसात तयारी झाली नाही. 1967 साली पवारांच नेतृत्व बारामतीला लाभलं.त्यावेळीस बारामतीची 21 गावे बागायती, 42 जिरायतीची होती, अशी ऐकूण 63 गावांची बारामती होती. त्याच्यामध्ये आप्पासाहेब पवार, सुप्रिया सुळे आणि राजेद्र पवार असे सगळेच जण राबले होते होते,असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

मी 1991ला ज्यावेळेस खासदार झालो, त्यावेळेस मनात यायचं की, पिंपरी चिंचवड शहरात पुण्याची लोक नोकरी करण्यासाठी बजाज किंवा टेल्को कंपनीत यायची, आणि पुन्हा संध्याकाळी वाहनांनी पुण्याला जायची, का तर त्यांना चांगल्या सुविधा पिंपरी चिंचवडमध्ये नव्हत्या. त्यावेळेस आम्ही निश्चय केला की, या शहरात अशा सुविधा निर्माण करायची की पुण्यातल्या माणसाला आपण पिंपरी चिंडवडमध्ये् राहावं असे वाटले पाहिजे. अशा पद्धतीने ध्येय ठेवून आम्ही कामाला लागलो,असा किस्सा अजित पवार यांनी सांगितला. यावेळी पवार (Ajit Pawar) साहेबांचे आशिर्वाद आम्हाला लाभले आणि अधिकाऱ्यांची उत्तम साथ मिळाली यामुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

या शहराने 2017 चा अपवाद वगळता सातत्याने माझे नगरसेवक निवडून दिली आहे.त्यामुळे काम करणे सोप्पे गेले.तसेच केंद्रात पवार साहेब असल्यामुळे आम्ही निधी आणू शकलो, असे देखील अजित पवार मुलाखतीत म्हणाले. आम्ही आमदारांना सांगतो की, सकाळी घरचे काम समजून 6 वाजताच कामाला सुरुवात करा. आमची जबाबदारी आहे, जनतेने आमच्या मागे प्रचंड शक्ती उभी के्ली आहे, त्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ नये,असेही पवार म्हणालेत.

दरम्यान नुसती बारामतीच नाही अनेक मतदार संघामध्ये तशाप्रकारची कामे सुरु आहेत. आता अडीच वर्षाचे सरकार गेले नाही, तर अजूनही टीकलो असते तर मोठं काम पाहायला मिळालं असते, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

    follow whatsapp