मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 40 आमदारांसोबत भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चांनी प्रचंड जोर धरला होता. यामुळे राज्यात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळेल अशी चर्चाही सुरू झाली होती. अखेर याबाबत स्वत: अजित पवारांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत त्यांची नेमकी काय भूमिका आहे आणि त्यांनी नेमका काय निर्णय घेतलाय याबाबत भाष्य केलं आहे. (ajit pawar has clearly declared his position whether he will go with bjp or not)
ADVERTISEMENT
महाविकास आघाडी एकत्र असल्यास भाजपला राज्यात सत्ता मिळविण्यासाठी झगडावं लागू शकतं. अशावेळी अजित पवारांसारखा नेता आपल्या हाती लागल्यास मोठा फायदा होऊ शकतो. असं भाजपच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच अजित पवार यांना भाजपसोबत घेण्याच्या चर्चा धरू लागल्या होत्या. त्यामुळेच या सगळ्या परिस्थितीबाबत स्पष्टता यावी म्हणून अजित पवार यांनी थेट माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली.
हे ही वाचा>> Ajit Pawar: ‘राष्ट्रवादी भाजपसोबत एकत्र आली तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार’
यावेळी अजित पवार यांनी त्यांच्याविषयी ज्या काही चर्चा सुरू आहेत त्याबाबत एक अगदी स्पष्टपणे सांगितलं की, ‘माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करेन.’ असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेबाबत एक घाव दोन तुकडे केले आहेत.
पाहा अजित पवार भाजपमध्ये जाण्याविषयी नेमकं काय म्हणाले:
‘आपण ज्या काही सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या दाखवत आहात.. मी आपल्याला सांगेन की, त्यात यत्किंचितही तथ्य नाही. कोणत्याही आमदारांच्या सह्या घेण्यात आलेल्या नाहीत. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत आणि पक्षातच कायम राहणार आहोत. बाकी सगळ्या अफवा आहेत.’ असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्याबाबत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
‘आपण ज्या काही सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या दाखवत आहात.. मी आपल्याला सांगेन की, त्यात यत्किंचितही तथ्य नाही. कोणत्याही आमदारांच्या सह्या घेण्यात आलेल्या नाहीत. असं काहीही आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत. त्यामुळे या प्रकारच्या बातम्यांना कोणताही आधार नाही.’
‘याबाबत दुसऱ्या पक्षाचे नेते देखील त्यांचं-त्यांचं मत व्यक्त करतात. आज मी नेहमीप्रमाणे माझा कार्यालयात बसतो. यावेळी आमदारांच्या कमिटीच्या मीटिंग असतात. अनेक आमदार मंत्र्यांकडे कामासाठी येतात. त्यामुळे आज पण जे आमदार इकडे आले होते. ते मला मी इथे असल्यानेच भेटायला आले होते. ही नेहमीची पद्धत आहे. यात वेगळा अर्थ काढू नका.’
हे ही वाचा>> भाऊ गमावला, आता बहिणीसाठी प्रार्थना…अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरसोबत काय घडतंय?
‘आमदारांची वेगवेगळी कामं होती ती कामं घेऊन ते येथे आले होते. यामुळे आपण ते वेगवेगळे आमदार भेटायला आल्याचे दाखवत आहात. त्यातून त्यांच्याबद्दल देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तोही संभ्रमावस्थेत जातो.’
‘मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे की, काही काळजी करू नका. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच राष्ट्रवादीची स्थापना झाली आहे. पण आता ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. त्यामागे आता महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष जाऊ नये त्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरु आहेत.’
हे ही वाचा>> आप्पासाहेबांच्या बंगल्याबाहेरची रांगोळी पुसली, रोषणाई उतरवली.. रेवदंड्यात काय स्थिती?
‘मला जो सरकारी बंगला मिळालाय देवगि री.. त्याच्या मागे काय कॅमेरा लावताय.. अरे काय चाललंय तुमचं.. बाहेर कॅमेरे लावून मी बोलणार आहे तिथे तुमच्याशी? जरुर तुम्हाला बातम्या मिळाल्या पाहिजे. पण मला तुमची अडचणीची विनंती आहे की, या बातम्यांमध्ये तथ्य नाही. मला माहित नाही कोण अंदाज व्यक्त करत आहेत.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
अजित पवार वापरणार धक्कातंत्र?
दरम्यान, असं असलं तरीही अजित पवार यांचं आजवरचं राजकारण पाहिलं तर ते धक्कातंत्र देण्यात पटाईत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अजित पवार हे आज जरी भाजपसोबत जाणार नाही असं म्हणत असले तरीही राजकीय घडामोडी या अतिशय वेगाने बदलत आहेत. अशावेळी काय निर्णय घ्यायचा याची तर अजित पवार चाचपणी करत नाहीत नाा? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगली आहे.
ADVERTISEMENT